हेल्थकेअर आयटी च्या विश्वात कोल्हापूरच्या मनोरमा इफोसोल्युशनसची उत्तुंग भरारी
कोल्हापूर/प्रतिनिधी : हेल्थकेअर आयटीच्या विश्वात कोल्हापूरच्या मनोरमा इफोसोल्युशनसने उत्तुंग भरारी घेतली आहे. मनोरमा इन्फोसोल्युशन्स प्रा.लि. ही एक ग्लोबल कंपनी असून ती वेगवेगळ्या देशांसाठी हेल्थकेअर डिजिटल सोल्युशन्स प्रदान करते.सार्वजनिक व खासगी रुग्णालयांच्या संपूर्ण ऑटोमेशन तसेच डेटावर आधारित AI प्रणालीचा वापर करून मनोरमाची सॉफ्टवेअर सिस्टिम ही सर्व आरोग्य केंद्रांना मदत करत आहेत. मनोरमा इफोसोल्युशन्स हे १९ वर्षांपासून डिजिटल हेल्थकेअर आयटी मधील अग्रगण्य नाव आहे. शासकीय आणि खाजगी आरोग्य क्षेत्रात मनोरमाने त्याच्या जनरल आणि स्पेशालिटी EMR,Telemedicine आणि इन्शुरन्स अशा नावीन्यपूर्ण सोल्युशन्स ने आपले नाव कोरले आहे अशी माहिती कंपनीच्या सीइओ अश्विनी दानीगौड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतात माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्र विकसित झाले आहे. वर्षानुवर्षे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रदात्याला डिजिटल परिवर्तन आत्मसात करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. कोल्हापूर मधील मनोरमा इफोसोल्युशन्स कंपनीने हा मार्ग आत्मसात केला असून
या कंपनीने मास्टर ऑफ रिस्क इन आयटी मिडकॅप कॅटेगरीमध्ये सातवी आवृत्ती पार करून भारतीय रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड २०१९ मिळविला आहे. जो सी एनबीसी टीव्ही १८ च्या आयोजनाने पार पडला. मनोरमा टीमने जागतिक प्रकल्प हाती घेतले असून ते इमर्जिंग टेक्नॉलॉजी व नाविन्यपूर्ण प्रक्रियेसह हेल्थकेअर प्रणालीचे उद्दिष्ट साध्य केले आहे.मनोरमाच्या लाईफलाईन सूट सोलूशन द्वारा अनेक देशातील डिजिटल हेल्थकेअर ट्रान्सफॉर्मेशन सक्षम झाले आहे.सार्वजनिक आरोग्य परिसंस्था,स्मार्ट सिरीजसाठी सॉफ्टवेअर सोल्युशन्स तसेच सर्वत्र असलेल्या महामारी मध्ये आरोग्य व्यवस्थापनाची गरज ओळखून टेलिहेल्थ सारखे सोलुशन निर्मिती व पुरवठा केल्याबद्दल संपूर्ण उद्योग जगतात मनोरमाची प्रशंसा केली जात आहे. नावीन्यपूर्ण व सकारात्मक परिणाम देणारे सोलुशन्स निर्माण करण्यात मनोरमाने पुढाकार घेतला आहे तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एनालिटिकस अंतर्भूत करून भविष्यातील आरोग्य सेवांसाठी नागिन नवीन मार्ग मनोरमाने मोकळा केला आहे. ही कंपनी २००० हून अधिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ग्राहकांना हेल्थकेअर आयटी सोलुशन पुरवली आहेत. अनेक रुग्णालये, आरोग्य विमा कंपन्या, स्मार्ट शहरे, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, ११ आंतरराष्ट्रीय देशांना आणि भारतातील मोठे आरोग्य प्रकल्पांना सोल्युशन पुरवून सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदान केली आहे.