प्रारूप मतदार यादी नागरीकांना पाहण्यासाठी व हरकती घेण्यासाठी महापालिकेची चारही विभागीय कार्यालय सुटटी दिवशीही सुरु
कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ पासून प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. हि यादी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. १ गांधी मैदान, विभागीय कार्यालय क्र. २ शिवाजी मार्केट, विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपुरी, विभागीय कार्यालय क्र.४ ताराराणी मार्केट तसेच मुख्य निवडणूक कार्यालय व महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील नागरीकांना त्यांच्या प्रभागामध्ये प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी उपलबध करुन दिली आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दि.१६ ते २३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दाखल करावयाची असलेने शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंती निमित्त व शनिवार व रविवारी सुटटी असलेने या दिवशीही सदरची प्रभागनिहाय मतदार यादी प्रभागात, विभागीय कार्यालय क्रं.१ ते ४ मुख्य निवडणूक कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध् असेल. त्याचबरोबर या मतदार यादीवरील हरकती आपल्या प्रभागातील संबंधित विभागीय कार्यालयक्र.१ ते ४ अंतर्गत कार्यरत असणारे उपशहर अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दाखल करता येतील.