सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्या चा वजन काटा अतिबिनचूक भरारी पथकाकडून तपासणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : से. कापशी बेलेवाडी काळम्मा (कागल)
येथील संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी चा वजन काटा भरारी पथकाने कारखाना कार्यस्थळावर अचानक भेट देऊन वजन काटा तपासणी केली यात वजन काटा बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाचे प्रमुख कागल विभागाचे वैधमापन शास्त्र निरीक्षक ए. ए. शिंगाडे यांनी दिला.कोल्हापूर चे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी साखर कारखान्याचे वजन काटे तपासण्यासाठी भरारी पथक नेमून आदेश दिले आहेत या पैकी वैध मापनशास्त्र निरीक्षक ए. ए. शिंगाडे यांच्या नेृत्त्वाखाली प्रथम लेखापरीक्षक साखर आयुक्त कोल्हापूर चे यु. आर.कुंभार , कापशीचे मंडल अधिकारी एस.एम. जंगले, मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार पो. निरीक्षक एस. एस. चव्हाण सहभागी झाले होते.
यावेळी वजन काट्यावर वजन होऊन गव्हाणिकडे गेलेल्या चार उसाच्या वाहनांची वजन पावती ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा वजन केले असता कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही या शिवाय २० किलो प्रमाणे पाच हजार किलो वजनाची प्रमाणित वजने काट्यावर ठेऊन पुन्हा तपासणी केली असता या मध्ये ही कोणतीच तफावत आढळून आली नसल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.या शिवाय प्रत्येक वाहन चालकाला वजन दर्शविणारे दर्शक केबिन बाहेर लावले आहेत उसाच्या भरलेल्या व रिकाम्या वाहनाचे एकाच वजन काट्यावर वजन होत आहे का या सर्व बाबींचा विचार करून कारखान्याचा वजन काटा बिनचूक असल्याचे प्रशिस्तपत्र व अहवाल कारखान्याकडे दिला.या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, चिफ इंजिनिअर हुसेन नदाफ विभाग प्रमुख भूषण हिरेमठ, केनयार्ड विभाग प्रमुख अमर माने उपस्थित होते.