राजाराम तलाव येथे आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा गुन्हा अवघ्या काही तासातच उघड
कोल्हापूर/प्रतिनिधी : राजाराम तलाव येथे आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा गुन्हा अवघ्या काही तासातच उघड झाला आहे.
राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत राजाराम तलाव येथील सरनोबतवाडीकडे जाणारे रोड लगत एक स्त्री जातीचे अर्धवट शरिर पडलेले असल्याची माहिती पोलीसांना मिळाली . सदरची माहिती अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे सर व उप विभागीय अधिकारी शहर विभाग , मंगेश चव्हाण सर यांना मिळाल्याने त्यानी राजारामपुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस अधिकारी यांना घटनास्थळी बोलावुन घेवुन घटणेची पहाणी केली . कोणीतरी अज्ञात आरोपीने अनोळखी महिलेचा खुन करुन बॉडी फेकुन दिल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले . घटणेचे गांभिर्य लक्षात घेवुन बॉडीची ओळख पटवणे तसेच खुन करण्याचे कारण व आरोपीचा शोध घेणे करीता ४ ते ५ पोलीस पथके तयार करुन तात्काळ शोधकार्य सुरु केले . शोधकार्य सुरु असताना , पोलीस निरीक्षक सिताराम डुबल पोलीस ठाणे राजारामपुरी हे इतर पोलीस ठाणेस मृत व्यक्तीच्या मिसींग चेक करीत असताना दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी करवीर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या मिसींग मध्ये ८० वयाच्या वयोवध्द महिला शांताबाई शामराव आगळे व व ८० रा .शोभा चव्हाण यांचे घरी भाडयाने जगताप कॉलणी पाचगाव कोल्हापुर हया बेपत्ता असल्याने मिसींग दाखल आहे . त्यानुसार मिसींग व्यक्तीचे नातेवाईकाचे कडुन खात्री करुन , बॉडी मिळाले ठिकाणी कपडे व इतर वस्तु दाखवील्या वरुन सदरची बॉर्डी शांताबाई शामराव आगळे व व ८० रा .शोभा चव्हाण यांची असल्याची खात्री पटली . मिसींग व्यक्तीचे नातेवाईक यांचेकडे केलेल्या सविस्तर चौकशी वरुन व मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन पोलीस उप अधिक्षक मंगेश चव्हाण यांनी संशयीत इसमनामे संतोष परिट यास स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत , करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदिप कोळेकर व पोलीस उप निरीक्षक विवेक राळेभात यांनी ताब्यात घेतले , पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी संतोष परिट यांचेकडे सखोल चौकशी केली असता संतोष निवृत्ती परिट वय – ३५ रा.राजलक्ष्मी अपार्टमेंट माळी कॉलनी , टाकाळा कोल्हापुर यांने सदरचा खुन केल्या बाबत कबुली दिली आहे . आरोपी संतोष निवृत्ती परिट हा मागील ५ वर्षा पासुन मयत शांताबाई शामराव आगळे व त्यांचे परिवारास ओळखत असुन तो कर्जबाजारी असल्याने मयत शांताबाई शामराव आगळे हया सोन्याचे दागीणे घालत असल्या बाबत त्याला माहिती होती . आरोपीने देवकार्य करण्याचे बहाण्याने दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी आजी शांताबाई शामराव आगळे हया रहात असले ठिकाणा वरुन आरोपीचे रहाते घरी त्यांना घेवुन जाऊन शांताबाई शामराव आगळे यांना जिवे ठार मारुन त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिणे काढुन घेतले . गुन्हयाचा तपास सुरु असुन गुन्हयाचा तपास पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण हे करीत असुन आरोपी संतोष निवृत्ती परिट यास आज खुनाच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे . हा गुन्हा पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे सर , अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे सर , उप विभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक साहिल झारकर , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत , राजारामपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल , पोलीस निरीक्षक संदिप कोळेकर पोलीस निरीक्षक अनिल गुजर , सहा पोलीस निरीक्षक सत्यराज घुले , महिला सहा पोलीस निरीक्षक जौंजाळ , पोलीस उप निरीक्षक विवेक राळेभात , विनायक सपाटे , समाधान घुगे , पोलीस अमलदार अमित सर्जे , खराडे , सागर कांडगावे , अमोल कोळेकर , संदिप कुंभार , राम कोळी , अजय वाडेकर , सुरेश पाटील , अर्जुन बंदरे , तानाजी गुरव , फिरोज मुल्ला , तसेच आरसीपी टिम यानी उघडकीस आणलेला आहे .