भारतीय आयुर्विमा मंडळाचे विकासराव कागल कार्यालयाला १३ फेब्रुवारी रोजी भेट देणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : १० नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय आयुर्विमा मंडळाचे कागल येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाने गेल्या तीन महिन्यात आघाडीची कामगिरी करून नावलौकिक मिळवलेला आहे. कार्यालयाची माहिती व कामकाज पाहण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे झोनल मॅनेजर विकास राव हे १३ फेब्रुवारी रोजी कागल कार्यालयास सदिच्छा भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूर डिव्हिजनचे मोघे,मार्केटिंग मॅनेजर श्री जगदिशा,सेल्स मॅनेजर गुळवणी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्री विकास राव हे कागल मधील प्रतिनिधी व विकास अधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती शाखा इन्चार्ज प्रशांत घाडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.