‘गुरुवर्य डी. डी.आसगावकर’ गौरव पुरस्काराचे शनिवारी कोल्हापुरात वितरण
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कुडित्रे तालुका करवीर येथील गुरुवर्य डी.डी. आसगावकर शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास संस्थेच्या वतीने शिक्षण संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी स्वर्गीय गुरुवर्य आसगावकर यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना गुरुवर्य आसगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थेचे सेक्रेटरी आ. प्रा. जयंत आसगावकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी कार्यकारी विश्वस्त डी. जी.खाडे संस्थेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.स्व.आसगावकर यांचा स्मृतिदिन प्रबोधन कार्यक्रमाने व्हावा यासाठी संस्था व ट्रस्ट गेली अकरा वर्षे प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करीत आली आहे.गेल्या तीन वर्षापासून ट्रस्टने जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षणसंस्था, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, संस्थांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १५ पुरस्कार देत आहे आली आहे याही वर्षी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. स्वर्गीय आसगावकर यांच्या नावे पुरस्कार देऊन पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न ट्रस्ट करीत आली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ हा राज्याचे गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये हातकणंगले तालुक्यातील श्री.ना.बा.एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्था, वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक म्हणून महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रभाकर लोखंडे, माध्यमिक मुख्याध्यापक मध्ये सौ सीमा सुनील सांगरूळकर,चुडाप्पा सागर कुमार, सहाय्यक शिक्षक माध्यमिक मध्ये बाबुराव भीमराव पाटील सागर पांडुरंग वातकर, सुधीर पांडुरंग कांबळे, गीता संजय मुरकुटे, बाबासो मारुती कुंभार, शिवानंद बाबुराव घस्ती, शयक शिक्षक क्रीडा अमित अशोक शिंत्रे, सौ स्वाती विनोद पंडित सहायक शिक्षक प्राथमिक श्री विलास नारायण आरेकर,शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक श्री अभिजित बाळासाहेब गायकवाड, श्री गुरव अनिलकुमार श्रीरंग संस्थात्मक आदींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.