Wednesday, October 9, 2024
Home ताज्या सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाची सरशी        

सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाची सरशी        

सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाची सरशी

कागल/प्रतिनिधी : आज ९ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने बाजी मारली आहे. कागल तालुक्यात एकूण ५३ सरपंच निवडी झाल्या, त्यापैकी तब्बल ३१  ग्रामपंचायतींवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या सरपंचांच्या निवडी झाल्या. शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाचे नऊ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाले. शिवसेनेच्याच खासदार प्रा. संजय मंडलिक गटाचे एकूण सहा सरपंच झाले. भाजपच्या सरपंचांमध्ये समरजितसिंह घाटगे गटाचे पाच, रणजितसिंह पाटील गटाचा व बाबासाहेब पाटील गटाचा प्रत्येकी एक अशा निवडी झाल्या.
मंत्री श्री. मुश्रीफ गटाच्या निवड झालेल्या ३१  गावांमध्ये सुळकुड, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, शंकरवाडी, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, केनवडे, पिंपळगाव बुद्रुक, मळगे खुर्द, मळगे बुद्रुक, केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, बिद्री, उंदरवाडी, अर्जुनी, लिंगनूर कापशी, खडकेवाडा, नानीबाई चिखली, कौलगे, माद्याळ, वडगाव, तमनाकवाडा, आलाबाद, कासारी, मागनूर, बेलेवाडी मासा, बोळावीवाडी, करंजीवणे या गावांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सरपंच झालेल्या नऊ गावांमध्ये शेंडूर, गोरंबे, म्हाकवे, बानगे, साके, भडगाव, सोनगे, यमगे, हसुर खुर्द या गावांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्याच खासदार संजय मंडलिक गटाचे सरपंच झालेल्या सहा गावांमध्ये बस्तवडे, सोनाळी, गलगले, कुरुकली, हळदी, मेतके या गावांचा समावेश आहे.
भाजपचे सरपंच झालेल्या गावांमध्ये समरजीत घाटगे गटाचे सरपंच झालेल्या एकोंडी, कुरणी, सावर्डे बुद्रुक, शिंदेवाडी व बेनिक्रे या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. भाजपच्याच रणजीतसिंह पाटील गटाचा हळदवडे येथे व याच पक्षाच्या बाबासाहेब पाटील गटाचा वाळवे खुर्द येथील सरपंच झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments