फेरीवाल्यांनी केले ठिय्या मारून आत्मक्लेश आंदोलन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेने कोणतीही चर्चा न करता अतिक्रमण मोहीम हाती घेऊ नये, अन्यथा महापालिका प्रशासनाला हिसका दाखवू अशा पद्धतीचा इशारा शहर आणि नागरी कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय फेरीवाला संघटनेने दिला आहे. सोमवारी शिवाजी चौक येथे शहरातील जवळपास ५०० हून अधिक फेरीवाल्यांनी ठिय्या मारू आत्मक्लेश आंदोलन केले. भर उन्हामध्ये फेरीवाल्या महिला लहान मुलांना घेऊन आंदोलनस्थळी सहभागी झाल्या होत्या.
कोल्हापूर शहर परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालले असून . वाहतुकीची कोंडी उडत आहे त्यामुळे आजपासून कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार आहे. मात्र कोल्हापुर सर्वपक्षीय फेरीवाला संघटनेने महापालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. जोपर्यंत सर्व फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्डचे वाटप होत नाही. तोपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊ नये, तसेच नव्या नियमानुसार अंबाबाई मंदिर परिसरातील शंभर मीटर च्या आत व्यापार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याला देखील फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. कोरोणामुळे आधीच संकटात असताना महापालिकेने हा नियम लागू करू नये, अशी देखील मागणी केली आहे. आज दुपारी फेरीवाले संघटना आणि महापालिका प्रशासन यांच्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने चर्चेशिवाय अतिक्रमण पाठवू नये, अन्यथा याबाबत उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.