भारती डेंटल कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी कु क्षितिज शेठ महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज सांगली येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी कु क्षितिज अशोक शेठ यास महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाला. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्ये निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन व त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांमधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात मिळालेला हा पहिलच पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळालेबद्दल राज्यमंत्री मा ना डॉ विश्वजीत कदम साहेब यांनी अभिनंदन केले. भारती विद्यापीठाचे मानद संचालक मा डॉ एच एम कदम सर यांचे हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला व प्राचार्या डॉ विद्या दोडवाड आणि रासेयो पुण्याचे कार्यक्रम समनव्यक डॉ अविनाश म्हेत्रे यांनी कौतुक केले. राष्टीय सेवा योजनेच्या सांगलीच्या ज़िल्हा समन्वयक डॉ समृद्धी मेथा व उप कार्यक्रम अधिकारी डॉ स्वप्नील मेथा यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे श्रीमती जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील, श्री. जितेशभय्या कदम, श्री. पृथ्वीराज (बाबा) पाटील, पालकमंत्र्यांच्या तर्फे श्री. संजयजी बजाज आणि राहूलजी पवार व सावकार गणपती मंडळ कॉलेज कॉर्नर यांनी अभिनंदन आणि कौतुक केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.