लक्ष्मीपुरी महिला मंच आणि आजरेकर फाउंडेशनच्या वतीने मुलांसाठी योगा,जिम्नॅस्टिक व स्केटिंग वर्ग सुरू
कोल्हापूर/प्रतिनिधी : मुलांसाठी व्यायाम आणि महिलांना आरोग्य आणि सौंदर्य खूप मोलाचे आहे.म्हणूनच, लक्ष्मीपुरी महिला मंच आणि आजरेकर फाउंडेशनच्या वतीने महिला,मुली व १ ते १२ वर्षापर्यंत मुला-मुलींचे आरोग्य संपन्न रहावे व लहानपणापासून व्यायामाची गोडी लागावी या करीता योगा,जिम्नॅस्टिक व स्केटिंग वर्ग सुरू केले जात आहेत. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहजालात अडकत चाललेल्या नव्या पिढीला जिम्नॅस्टिक सारख्या व्यायाम प्रकाराची आवड लावली तर सुदृढ नव्या पिढीसोबतच यशस्वी खेळाडू घडवण्याचे महान कार्य सुद्धा करायला हवे हा उद्देश घेऊन लक्ष्मीपुरी मध्ये नवीन उपक्रम सुरू केला जात आहे.याची सुरुवात शनिवारी ६ फेब्रुवारी रोजी शेलाजी वनाजी विद्यालय चांदणी चौक लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे सायंकाळी ५ वाजता ईश्काची नौका फेम प्रसिद्ध सिने तारका,प्रिन्सेस ऑफमहाराष्ट्र, प्रांजल पालकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे,याचवेळी भारतातील सुप्रसिद्ध आयुर्वेदा तज्ञ आणि सौंदर्य तज्ञ डॉ. मंजिरी घेवारी यांचे शरीर रोग, मानसरोग,त्वचा रोग,स्थौल्य चिकित्सा, मुखसौंदर्य, गर्भिणी, केशसौंदर्य, सौंदर्य चिकित्सा, अस्थिचिकित्सा,मधुमेह, बालरोग, चिंतन,योग आदी विषयावर मौलिक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर महानगरपालिका मा महापौर सौ नीलोफर आश्किन आजरेकर आहेत.सर्व महिला आणि मुलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मीपुरी महिला मंच व आजरेकर फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.