पावनगडावर सापडले तब्बल ४०६ तोफगोळे,शिवकालीन असण्याची व आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर महादेवाच्या मंदिरा शेजारी एक नव्हे तर तब्बल ४०६ तोफगोळे आज सापडले आहेत. हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. गडावरील महादेवाच्या मंदिरा शेजारी दिशादर्शक फ़लक लावण्यासाठी खड्डे खोदताना खड्यात फलक लावताना हे तोफगोळे सापडल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे.
पावनगड हा स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाधला आहे. वनविभाग आणि टीम पावनगड ही संघटना गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम करत आहेत. याचवेळी हे गोळे सापडले आहेत.दरम्यान हे तोफगोळे सापडल्याने इतिहासप्रेमीं व शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार पूर्वीच्याकाळी मंदिराशेजारी दारू गोळ्याचे कोठार होते.त्यामुळे आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.दरम्यान, पुरातत्व विभागाकडून या तोफगोळ्यांचे पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.