चिक्कोडी तालुक्यातील दोघांकडून नऊ गुन्हे उघड ; ११ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे व अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कोल्हापूर जिल्हयात सातत्याने होत असलेल्या चैन स्नाचिंग (पायी चालत जाणारे महिलांच्या) चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत उघडकीस आणण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले व पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांची तपास पथके तयार करुन हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबविली. राधानगरी पोलीस ठाणे कडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी चंद्रकांत महावीर माने शक्ती साखर सखाराम माने दोघे राहणार मानकापूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव या दोघांनी मिळून केल्याचे दिसून आले यामध्ये जबरदस्तीने चोरून नेले सोन्याचे चिताक विक्रीकरिता २२ जानेवारी २०२१ रोजी तालुका जिल्हा कोल्हापूर येथे मोटरसायकल क्रमांक एम एच -०९ बीएक्स २०८२ वरून येणार असले बाबतची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पथकाने मिळालेल्या माहितीनुसार रेंदाळ
तालुका हातकणंगले येथील गणपती मंदिराजवळ २२ जानेवारी रोजी सापळा लावून चार वाजून दहा मिनिटांनी संशयित चंद्रकांत महावीर माने व शक्ती सखाराम माने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली या झडतीमध्ये त्यांच्याकडून ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे चिताक मिळून आले.याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी राधानगरी पोलीस ठाणे येथे चोरी केली असल्याची कबुली दिली.आणखी चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यात आणखी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली यामध्ये आरोपी चंद्रकांत माने व त्याचा साथीदार लखन माने यांनी हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले यामध्ये राधानगरी पोलीस ठाणे २, मुरगूड पोलिस ठाणे २, गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे २शिरोळ २ व हातकणंगले १ असे एकूण नऊ ठिकाणी चोरी केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत या सर्व गुन्ह्यात आरोपींकडून ११ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हा करणे करता वापरलेली स्प्लेंडर मोटर सायकल एकूण ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बळकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत,सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार नितीन तोथे, अजय वाडेकर अमोल कोळेकर,अर्जुन बंद्रे, कृष्णा पिंगळे,संदीप कुंभार, सागर काढगावे, रामचंद्र कोळी,ओमकार परब, अजय सावंत, संदीप तळेकर, अमर वासुदेव,संजय पडवळ, संतोष पाटील,रफी आवळकर, राजेंद्र वंडेकर यांनी केली.