शहरात डेंग्यु,चिकुनगुनिया साथरोगनियंत्रणाकरीता डास-अळी सर्व्हेक्षण
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्यावतीने आज आरोग्य किटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोगनियंत्रणा करीता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एकूण २०१६ घरे तपासण्यात आली. या घंरामध्ये वापरासाठी साठविण्यात येणारे ३८५४ कंटेनर तपासले. यामध्ये दुषित ३६ ठिकाणी डास-अळी आढळल्या. दुषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकणेत आले आहे.
महापालिकेच्यावतीने खाजगी एजन्सी मार्फत २५ बिडिंग चेकर्स् नेमणेत आले आहेत. आरोग्य निरिक्षक, मुकादम, डासअळी सर्व्हेक्षण कर्मचारी यांचे सोबत या बिडींग चेकर्सनी अक्षय पार्क, गंधर्व अपार्टमेंट, नागाळा पार्क, तानुबाई नगर, एश्वर्या पार्क, रॉयल अपार्टमेंट, विवेकानंद कॉलेज, कनाननगर झोपडपट्टी, लक्षदिप नगर, शाहुपूरी व्हिनस स्टेशनरोड, केळवकर हॉस्पीटल परिसर, कल्पना रेसिडन्सी, ट्रेड सेंटर, संचाल कॉलनी, मिसाळ गल्ली, घोरपडे गल्ली, चव्हाण चाळ, ए.पी.हायस्कुल मागील परिसर, रमाई गल्ली इत्यादी ठिकाणी डास-अळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. तरी आरोग्य विभागाकडूनशहरातील नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहनकरण्यात येत आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया चीलक्षणे आढळलेस को.म.न.पा. आरोग्यविभाग व शासकीय रुग्णालयाशी त्वरीतसंपर्क साधावा. सेप्टिक टँक व्हेंट पाईपलाजाळी बसविणेत यावी. आठवडयामध्येसाठणा-या पाण्याचे पिंप/भांडी एकाचठिकाणी भरुन एक दिवस कोरडा दिवसपाळणेत यावा. फ्रिजमधील डिफ्रॉस ट्रे मधीलपाणी आठ दिवसातून एकदा रिकामे करणेतयावे. घराजवळील परिसरामध्ये रिकामेटायर्स्, नारळाच्या करवंटया, डबे इत्यादीमध्येपाणी साठू न देणेघरामध्ये लांब बाहयांचे वसंपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावे. डासप्रतिबंधक कॉईल तथा क्रिम वापरावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.