कागल शहर शिवसेना महिला आघाडी कडून हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेना कागल शहर महिला आघाडी कडून शाहू नगरवाचनालय ठिकाणी शिवसेना शहर महिला संघटिका दिपाली घोरपडे यांच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, जिल्हा महिला संघटिका शुभांगी पोवार, विद्या गिरी, स्मिता सावंत, शिवसेना विभागप्रमुख वैभव आडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस जास्मिन मुल्लाणी, सुनिता जोडबुद्री,सविता पुजारी आरोग्य विभाग मिनाक्षी मांडरेकर,रंजना खबिले,सुरेख गाडीवडर यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान केला.सदर कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सुत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी केले तर आभार दिपाली घोरपडे यांनी मानले.