केआयटी मध्ये एआय आणि मशिन लर्निंग वरील कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर महाविद्यालयात संगणकशारुा विभागातर्फे एआयसीटीई प्रायोजित मॉडर्न ट्रेंडस इन एआय आणि लर्निंग या विषयावरील सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या एफडीपीची प्रमुख उद्दिष्टे एआय आणि मशिन लर्निंगमधील विविध बाजू समजून घेणे आणि वेगवेगळया केस स्टडीजद्वारे संशोधन आणि नाविन्य वाढविण्याकरिता प्राध्यापकांना सहाय्य करणे अशी होती. या सहा दिवसीय कार्यशाळेस कोल्हापूरसह जालना, पालघर, सोलापूर, नागपूर, नाशिक, सांगली, मुंबई तसेच कर्नाटक, आसाम, उत्तम प्रदेश व आंध्रप्रदेश अशा विविध भागातून 156 प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाची सुरवात संयोजक व हेड ऑफ डिपार्टमेंट डॉ. ममता कलस यांनी एफडीपीचा संक्षिप्त आढावा घेवून केली. त्यानंतर संचालक डॉ.व्ही. व्ही. कार्जिन्नी यंी सहभागी प्राध्यापकांना संबोधित केले. समन्वयक प्रा. उमा गुरव यांनी एफडीपीचे वेळापत्रक स्पष्ट केले.
या कार्यशाळेस प्रा. आर.चंद्रशेखर (चीफ एक्झीक्युटिव्ह ऑफिसर, नेव्ही एआय), मयुरेश हुली (एमएल संशोधक, टेक्सास, युएसए), डॉ.पी.जे.कुलकर्णी (माजी उपसंचालक, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली), डॉ.शिवदत्त प्रभु (संचालक, नेल्सन कन्झ्युमर नुरोसायन्स), डॉ.सुनिल माने (विभाग कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे), डॉ.सुप्रवा पटनायक (भुवनेश्वर, ओडिसा) व डॉ. रजनी कामत (सायबर, कोल्हापूर) यांसारख्या दिग्गज मान्यवरांचे विविध विषयांवरील प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत वक्त्यांनी न्युरोसायन्स, हेल्थ केअर, नेटवर्क व नॉव्हेल कोव्हिड 19 यासारख्या विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमाचा समारोप संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी यांच्या उपस्थितीत झाला.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी चेअरमन श्री. भरत पाटील, व्हा.चेअरमन श्री. सुनिल कुलकर्णी, सेक्रेटरी श्री दिपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. संगणकशारुा विभाग प्रमुख व संयोजक डॉ. ममता कलस, मुख्य समन्वयक प्रा. उभा गुरव, उप-समन्वयक प्रा. पुजा पाटील आणि प्रा. संदीप राबाडे यांनी परिश्रम घेतले.