Monday, December 2, 2024

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले,हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यड्रावकर बेळगावात

 

मुंबई/प्रतिनिधी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर आज अडविले. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघाले होते.
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर मंत्री बेळगावकडे निघाले होते. मात्र कर्नाटक पोलिसांकडून त्यांना कर्नाटकच्या सीमेवर अडविण्यात आले आहे. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांच्या या कारवाई विरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा विश्वास आम्हाला वाटतो आम्ही हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध
राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क आहे, मात्र देशाचे गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत असताना तो हक्क नाकारला जात असल्याने आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची शक्यता राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांच्या या कारवाई विरोधात यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments