केआयटीमध्ये आरडुइनो एम्बेडेड सिस्टीम
५ दिवसीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरातील कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित ५ दिवसीय आरडुइनो मॉडर्न एम्बेडेड सिस्टीम या विषयावरील ५ दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. दि. ५ जानेवारी 2021 पासून सुरु झालेली ही कार्यशाळा विद्युत अभियांत्रिक विभागातील विद्यार्थी व शिक्षक वर्गासाठी एइरोबोटिक्स टेकसोल्युशन्स या संस्थेचे संस्थापक मा. अजिंक्य दिक्षीत यांनी घेतली. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आरडुइनो मॉडर्न एम्बेडेड सिस्टीम वरती वेगवेगळे प्रयोग अनुभवायला व शिकायला मिळाले. तसेच याअंतर्गत करावयाचे प्रोग्रॅमिंग, कोडिंग आणि त्याबाबतचे तंत्र अशा अनेकविध गोष्टी सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना कुशल मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष करायला मिळाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रियांका कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सुश्मिता सरकार यांनी काम पाहिले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी केआयटीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी, सचिव श्री. दिपक चौगुले, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.