श्री दत्त मंदिर नेहरूनगर येथे श्री दत्त जयंती साध्या पद्धतीने साजरी
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री दत्त मंदिर नेहरूनगर येथे श्री दत्त जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. नेहमीच्या वार्षिक जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना फाटा देऊन कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात आला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी श्री दत्त गुरूं चा जन्म सोहळा पार पडला नेहमीच्या पद्धतीने महाप्रसादास फाटा देऊन द्रोणातून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले दिनांक एकवीस डिसेंबर पासून रोज अतिशय साध्या पद्धतीने श्रींच्या मूर्तीस अभिषेक आणि सायंकाळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून आरती एवढेच कार्यक्रम या वर्षी आयोजित करण्यात आले होते अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात पण शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून यावर्षीचा दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला.