Monday, July 15, 2024
Home ताज्या शेंडा पार्क येथील झाडांना नवसंजीवनी देणार - आ.ऋतुराज पाटील

शेंडा पार्क येथील झाडांना नवसंजीवनी देणार – आ.ऋतुराज पाटील

शेंडा पार्क येथील झाडांना नवसंजीवनी देणार – आ.ऋतुराज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेंडा पार्कपरिसरातील आगीची झळ पोचलेल्या झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी वाय पाटील ग्रुपकडून दरोराज पंधरा टँकरद्वारे पाणी झाडांना देण्याचे नियोजन केल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. या झाडांच्या संवर्धनासाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून तात्काळ निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली.तसेच विविध स्वयंसेवी संस्था आणि युवकांच्या सहभागातून या झाडांचे मल्चिंग करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेंडा पार्क येथे आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकारी, पाचगाव , मोरेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या.
आमदार पाटील यांनी शेंडा पार्क येथील आगीमुळे नुकसान झालेल्या परिसराची तासभर पाहणी केली.
या आगीची सुमारे २५ हजार झाडांना झळ पोचली असून यातील लहान आकाराची सुमारे तीन हजार झाडे पूर्णपणे जळाली आहेत , उर्वरित झाडांना जर पाणी दिले तर ती झाडे जगातील अशी माहिती उपस्थित अधिकारी यांनी दिली. यावर डी.वाय.पाटील ग्रुपतर्फे दररोज १५ टँकर देऊ, तसेच मोरेवाडी, पाचगाव ग्रामपंचायत सुद्धा यासाठी सहकार्य करेल.कोल्हापूरातील स्वयंसेवी संस्थानासुद्धा यासाठी विनंती करणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.
जी ३ हजार झाडे जळाली आहेत, ती झाडे सामाजिक वनीकरण विभागाने पुन्हा नव्याने लावावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
हा भाग नागरी वस्तीच्या जवळ आहे त्यामुळे कचरा जाळल्याने हा प्रकार घडला असून या संपूर्ण जमिनी भोवती कुंपण घालणे गरजेचे असल्याचे वृक्षाप्रेमींनी सांगितले . कोरोनामुळे मिळणारा निधी मिळाला नसल्याने काम करताना अडचणी येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.यावर वनमंत्री यांच्याशी संपर्क करून निधीचा प्रश्न मार्गी लावू असे आ.पाटील यांनी सांगितले.ही झाडे जगविण्यासाठी आ.पाटील यांनी पुढाकार घेतल्याने ही झाडे जगविण्यासाठी पाठबळ मिळेल, असे वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुडडे यांनी सांगितले. पाचगाव आणि मोरेवाडी ग्रामपंचायत लागेल ते सर्व सहकार्य करेल,अशी ग्वाही पाचगावचे सरपंच संग्राम पाटील आणि मोरेवाडी सरपंच दत्तात्रय भिलुगडे यांनी दिली.येथील गवत जळल्याने लिलाव घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता गवत मिळणार नाही, त्यामुळं त्यांची लिलावातील रक्कम परत करावी,अशी मागणी नारायण गाडगीळ यांनी केली.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.आर .शिंदे,सहाय्यक वन संरक्षक एम.बी. चंदनशिवे, उद्यान विभाग प्रमुख डॉ एस.व्ही. सावंत, करवीरचे वनपाल एस. बी. देसाई यांच्यासह पाचगाव,मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आणि वृक्षप्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments