कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार – प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांची घोषणा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर महानगरपालिकेत वर्षानुवर्षे चालत असलेला भ्रष्टाचार, ढपला संस्कृती, आणि पालिकेतील बरबटलेली व्यवस्था हे सध्याचे चित्र आहे हे चित्र बदलायचे असेल तर चांगल्या व्यक्तींनी महापालिका निवडून जावे लागेल दिल्लीमध्ये झालेल्या सुधारणा कोल्हापुरात देखील होऊ शकतात त्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने विकासाभिमुख,ढपला संस्कृतीला पायबंद घालणारे,शहराचा विकास करण्यासाठी धोरण बाळगून महापालिकेच्या वतीने त्यांची अंमलबजावणी करणारे उमेदवार देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही शिक्षण, आरोग्य, घरफळा, सुलभीकरण आणि घरपोच दाखले, पर्यावरण,वाहतूक व्यवस्था, पर्यटन विकास,हद्दवाढ आणि क्रीडा यासारख्या मुद्यांवर लढली जाणार आहे .जाहिरनाम्यामध्ये जनतेचे मत विचारात घेतले जाणार असून सर्व थरातल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून जाहीरनामा बनविणारा बनविण्यात येणार आहे यासाठी विविध तज्ञांची समिती गठित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेची निवडणूक काहींसाठी व्यवसाय झाला आहे निवडून येण्यासाठी पैसे लावायचे आणि निवडून आल्यावर ते काढून घेण्यासाठी प्रयत्न करायची ही पद्धत मोडीत काढण्यासाठी आम आदमी पार्टी जनतेतून देणग्या घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे सदस्य प्रचार समिती तयार करण्यात आली आहे त्याची घोषणाही आज करण्यात आली यामध्ये नूतन प्रचार प्रभाग समिती अध्यक्ष संदीप देसाई यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष म्हणून उत्तम पाटील,संतोष घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रचार सचिव म्हणून सुरज सुर्वे आदम शेख यांची निवड तर मोईन मोकाशी अमरजा पाटील यांची प्रचार सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. खजिनदार म्हणून अभिजीत भोसले, सोशल मीडिया समन्वयक म्हणून सत्यजित जाधव गिरीश पाटील यांचा समावेश आहे तर सदस्य म्हणून शिवाजी मोरे,इलाही शेख, राकेश गायकवाड, अश्विनी गुरुव,पौर्णिमा निंबाळकर,निलेश रेडेकर, सुदर्शन कदम यांची निवड करण्यात आली आहे.तरी इच्छुक उमेदवार यांनी आम आदमी पार्टीच्या उद्यम नगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात संपर्क साधावयाचा आहे समाजातील विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे महापालिकेच्या निवडणुकीत तगडे स्पर्धक म्हणून आम आदमी पार्टी दिसणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राज्य सचिव धनंजय शिंदे,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर,युवा अध्यक्ष उत्तम पाटील,अमरजा पाटील आदी उपस्थित होते.