प्राथमिक शिक्षक समिती तर्फे नेहरुनगर विद्यालयात रक्तदान शिबिर
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शहर शाखा कोल्हापूर मार्फत संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै २०२० रोजी रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजन करण्यात आले होते परंतु कोरोना १९ या महामारीच्या सदृश्य वातावरणामुळे तसेच कडक लॉक डाउन असल्यामुळे सदर चा उपक्रम रद्द करावा लागला होता .तोच उपक्रम आपण सोमवार दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी मनपा नेहरूनगर विद्यालय या ठिकाणी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे .त्याच बरोबर इंग्रजी भाषण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुद्धा आपण घेत आहोत.तरी आपणा सर्वांना विनंती आहे कोरोना महामारी मुळे सर्व ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा भासत आहे तरी सर्व रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.सदरच्या उपक्रमाला सर्व शिक्षक / सेवकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन राज्यप्रमुख सुधाकर सावंत राज्यउपाध्यक्ष उमेश देसाई, शहराध्यक्ष संजय पाटील,संजय कडगावे, सुभाष धादवाड व वसंत आडके यांनी केले