Sunday, October 27, 2024
Home ताज्या पाण्यासाठी कोरड्या नदीत खड्डे खोदलेला व वाकुरी मारलेला मी शेतकरी -ग्रामविकास मंत्री...

पाण्यासाठी कोरड्या नदीत खड्डे खोदलेला व वाकुरी मारलेला मी शेतकरी -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन     

पाण्यासाठी कोरड्या नदीत खड्डे खोदलेला व वाकुरी मारलेला मी शेतकरी -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल/प्रतिनिधी :  कोरड्या नदीत पाण्यासाठी खड्डे खोदलेला व उसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पर्यटनासाठी बांधा- बांधावर जाणारा मी न्हवे, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले.
कागल शहराकडून जाधव मळ्यातून करनुरकडे जाणाऱ्या पानंद रस्त्याच्या खडीकरण, रुंदीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरण या कामाचा शुभारंभ कार्यक्रमात श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते.
यावेळी करनूर पानंद, वंदूर पानंद, मौलाली मळा पानंद, करंजे पानंद, पसारेवाडी पानंद, आदी पानंदीच्या खडीकरण, रुंदीकरण, मजबुतीकरणासह डांबरीकरणाच्या साडेसहा कोटी कामांचा शुभारंभ श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, १९७२  साली वडिलांच्या निधनानंतर थोरल्या बंधूंच्या नोकरीमुळे शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली. महाविद्यालयीन शिक्षण करित मी दररोज शेतात जायचो. १९८० -८१ च्या दरम्यान  काळम्मावाडी धरण नव्हतं. त्यावेळी नदीत शेतीच्या पाण्यासाठी मी खड्डे खोदलेला व उसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे. शेताकडे जाताना गुडघाभर चिखलातून गम बूट घालून वाट काढणे, हेही मी अनुभवल आहे, असेही ते म्हणाले. शेतीमध्ये उसासह कलिंगड, भाजीपाला, पपई असे नवनवीन प्रयोग करणारा मी शेतकरी होतो, असे सांगतानाच श्री मुश्रीफ म्हणाले नंतर राजकारणाचा नाद लागला आणि शेताकडे जाणं बंद झालं. आत्ता माझी पत्नी शेतीची जबाबदारी सांभाळते.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, अतुल जोशी, पी. बी. घाटगे, नगरसेवक सतीश घाडगे, विवेक लोटे, बाबासाहेब नाईक सौ. शोभा लाड, सौ. माधवी मोरबाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट……
शेतकऱ्यांची फसवणूक आणि प्रश्नांची सोडवणूक!
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, अलिकडे काहीजण निव्वळ स्टंटबाजी करीत स्वतः झुणका भाकर सोबत घेऊन बांधावर जात आहेत. हाच धागा पकडत भैय्या माने म्हणाले, ते बांधावर जाऊन शेतकर्‍यांना फसवत आहेत मंत्री हसन मुश्रीफ शेतात आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments