मराठा आरक्षणावर सुनावणी जानेवारीत,विद्यार्थ्यांचे काय होणार?
कोल्हापूर/(श्रद्धा जोगळेकर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण भारतभर मूक मोर्चा काढण्यात आला या मूक मोर्चात सर्वच समाजातील लोकांनी सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत लोक रस्त्यावर उतरले होते.
संपूर्ण महाराष्ट्र या आरक्षणाच्या मुद्यावरून रस्त्यावर उतरला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते मूक मोर्चा काढून मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या मागणीसाठी लोकांनी उद्रेक व्यक्त केला होता.
या आंदोलनामध्ये सर्व राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना यांचे कार्यकर्ते पदाधिकारी, माध्यम कर्मी, सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, वाहन धारक संघटना, एसटी संघटना सर्वजण यामध्ये सहभागी झाले होते याबाबत सरकारने सकारात्मक दर्शविली होती मराठा आरक्षणाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात आहे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट अद्यापि यावर निर्णय देण्यास मागेपुढे पाहत आहे असे बोलले जात आहे. आजही या मराठा आरक्षणावर सुनावणी होणार होती तीही झाली नाही आता याची तारीख जानेवारी महिन्यात पुढील देण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने असे का केले यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे याच बरोबर आता जे सत्तेत सरकार आहे त्यांच्यावर बोट दाखविले जात आहे मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आधीच कोरोणाच्या कालावधीत शाळा सुरू नाहीत. त्यामुळे मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे विविध क्षेत्रात महाविद्यालयात शाळा कॉलेजमध्ये मुलांना शिक्षण शिकायचे आहे प्रवेश घ्यायचे आहे यासाठी हे आरक्षण निश्चित होणे अत्यंत गरजेचे आहे बऱ्याच ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरतीची प्रक्रिया अवलंबून नोकऱ्या दिल्या जात आहेत यालाही मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे इंजिनीअरिंगच्या मुलांना अद्याप प्रवेश नसल्याने मराठा आरक्षण जाहीर नसल्याने इतर विद्यार्थ्याचे तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थी यांचे नुकसान होत आहे. या सर्व गोष्टीला जबाबदार सरकारला धरले जात आहे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत मात्र मराठा आरक्षणाचा निर्णय हा संपूर्णपणे सुप्रीम कोर्टात लागणार असून सुप्रीम कोर्ट अद्याप याबाबत कोणताही निर्णय देत नसल्याने पुन्हा आरक्षणाबाबत पेच निर्माण झालेला आहे. आज ९ डिसेंबर २०२० रोजी मराठा आरक्षण वर सुनावणी होणार होती मात्र या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आणि पुन्हा जानेवारीमध्ये तारीख ढकलण्यात आली यामुळे हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आता जानेवारीमध्ये उपस्थित होणार आहे तोपर्यंत शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होणार आहेच त्यांच्या बरोबर इतरही मुलांवर अन्याय होणार आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे या आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वच समाजातून एकता दाखविण्यात आली होती मात्र आता पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्य या पूर्णपणे आरक्षणावर अवलंबून असल्याने आता जानेवारीमध्ये तरी याबाबत निर्णय होणार का अशी विचारणा विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातून होत आहे.