Saturday, October 26, 2024
Home ताज्या भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत मागणीसाठी पुकारलेल्या भारत...

भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मिळाला कोल्हापूरमध्ये प्रतिसाद

भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मिळाला कोल्हापूरमध्ये प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. कोल्हापूर सांगली जिल्ह्यात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बिंदू चौक मध्ये विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले शिवसेनेच्या वतीने रॅली काढण्यात आली तावडे हॉटेल येथे रास्ता रोको करण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला रिक्षा व्यवसायी आज बंद होता कोल्हापूर जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला आज बंदच्या पार्श्वभूमीवर तुरळक प्रमाणात रस्त्यावर वाहने फिरली या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठीं व या कायद्यांना विरोध करण्यासाठीं आज अजिंक्यतारा कार्यालयात ‘काळा झेंडा’ उभारण्यात आला होता.
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूरमध्ये दिला आहे.
कोल्हापुरातील बिंदू चौक येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले या ठिकाणी शेट्टी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
कोणीही प्रतिष्ठा पणाला लावली तरी शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठा नाही. हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकऱ्यांच्या मुळेच हा देश चालला आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कोणी मोठा असूच शकत नाही, असे शेट्टींनी यावेळी म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना मान्य नसलेले जे कायदे आहेत, ते मागे घ्यावे. हमीभाव कायदेशीर करावा, हाच यावरचा पर्याय आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये हे लादलेले कायदे मागे घेतले नाहीत तर, देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.
शिवाय केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे असल्याचे सांगत आहे. मात्र, हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असते तर, आजच्या भारत बंदमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसते असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments