पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत श्री.अरुण लाड विजयी
पुणे/प्रतिनिधी : पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.
श्री. अरुण लाड यांना लाख २२ हजार १४५ मते मिळाली. एकूण मतदान २ लाख ४७ हजार ६८७ इतके झाले त्यापैंकी २ लाख २८ हजार २५९ मते वैध तर १९ हजार ४२८ इतकी मते अवैध ठरली.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले, निवडणूकीसाठी एकूण उमेदवार निवडणूक लढवीत होते.