Sunday, October 27, 2024
Home ताज्या "स्टॉप टेरेरिझम" चा संदेश देत विश्वविक्रमवीर डॉ.अथर्व गोंधळीने २६/११ या दहशतवादी हल्ल्यात...

“स्टॉप टेरेरिझम” चा संदेश देत विश्वविक्रमवीर डॉ.अथर्व गोंधळीने २६/११ या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना सायकल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली

“स्टॉप टेरेरिझम” चा संदेश देत विश्वविक्रमवीर डॉ.अथर्व गोंधळीने २६/११ या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना सायकल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर/प्रतिनिधी : २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई हॉटेल ताज वर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात अशोक कामटे,विजय साळसकर,हेमंत करकरे,तुकाराम होमबाळे,संदीप उनिकृष्णन आदींनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी हे सर्व धारातीर्थी पडले होते.या शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यासाठी विश्व विक्रमवीर डॉक्टर अथर्व गोंधळी यांनी “स्टॉप टेरेरिझम” असा संदेश टोप संभापूर ते जवाहरनगर अशी सायकल रॅली काढून आदरांजली वाहिली.
याच बरोबर बहिरेवाडी येथील जवान हृषीकेश जोंधळे व निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांना पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले होते त्यांनाही अथर्वने यावेळी श्रद्धांजली वाहिली.
टोप संभापूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झेंडा दाखवून या सायकल रॅलीस सुरुवात झाली.टोप संभापूर शिरोली हायवे,तावडे हॉटेल मार्गे जवाहरनगर असा मार्ग होता.याठिकाणी आल्यावर डॉ. अथर्वचे तायक्वांदो फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णात जंगम,आशिष कदम यांनी भारताचे संविधान उद्देशिका देऊन स्वागत केले.यावेळी २६/११ च्या घटनेत शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना बहुजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठानच्या वतीने कँडल लावून आदरांजली वाहण्यात आली व प्रतिष्ठानचे सचिव अनिल माळवी यांनी प्रशस्तीपत्र देऊन डॉ अथर्वचा सत्कार केला.यावेळी माळवी यांनी डॉ अथर्व चा परिचय करून दिला व लहान वयात अथर्व करत असलेल्या या कार्याचे कौतुक केले. यावेळी डी.वाय. एस. पी स्वाती गायकवाड,विजय साळुंखे,बहुजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र शिर्के आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments