सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रूपये – अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची माहिती
सेनापती कापशी/प्रतिनिधी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची पहिल्या पंधरवड्याची ऊसाची एकरकमी एफ.आर.पी.२८९२ रुपये इतकी आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी- वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढली आहेत. दरम्यान, गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी झालेला बँकांचा संप व शनिवार दि.२८, रविवार दि. २९ व सोमवारी दि. ३० बँकांना सुट्टी असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवार ता. ३ डिसेंबर २०२० पासून आपआपली खाती असलेल्या बँकेमध्ये संपर्क साधून बिले घेऊन जावीत, असे पत्रक कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी काढले आहे.
सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे, अशी विनंती श्री. मुश्रीफ यानी पत्रकात केली आहे.