छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी मुलांनी स्वतः अभ्यास करून शिवाजी महाराज जाणून घेणे आवश्यक – शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठे व्यक्तिमत्व असून ते जाणून घेणे सोपे नाही त्याचा इतिहास पुसण्याचे काम केले गेलेले आहे त्यांचा इतिहास व त्यांना समजून व जाणून घेण्यासाठी बालचमुनी व मुलांनी स्वतः अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केले.
शिवसेना आणि भवानी फाऊंडेशन आयोजित गडकिल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.गडकिल्ले स्पर्धा या १७ व १८ नोव्हेंम्बर रोजी घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे नियोजन भवानी फाऊंडेशन अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी केले होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण,इंद्रजित पाटील,युवासेना जिल्हा युवा अधिकारी मनजीत माने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय पवार यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदृष्टीने अभ्यास करावा लागतो व मी जिंकणार अशी अपेक्षा ठेवूनच स्पर्धेत उतरायचे असते साडेतीनशे वर्षे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिले त्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे. शिवाजी महाराज किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा इतिहास किती मोठा आहे हे जाणून घेण्यासाठी मुलांनी स्वतः अभ्यास करणे माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुलांपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले. शिवाजी महाराजांना कोणीही विसरू शकत नाही शिवाजी महाराजांनी उभे केलेले ३६० किल्ल्यांचा विकास मांडणारी व्यक्ती पिढीसमोर आणून माहिती देणे आवश्यक असल्याचेही मत पवार यांनी बोलून दाखविले.
सुजित चव्हाण बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि वैभव आहेत आपण साडेतीनशे वर्ष जय भवानी जय शिवाजी करत असतो पण कायम त्यांना समरणात ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात हर्षल सुर्वे यांनी बोलताना मुले किल्ले बनविताना विरोध होतो तर प्रत्यक्ष महाराजांना विस्थापितांविरोधासाठी किती यातना सहन कराव्या लागल्या असतील याचा विचार करणे आवश्यक आहे असे सांगून मी या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी बनविलेले किल्ले पाहिले तेव्हा मला मावळे पुन्हा जन्माला आले की काय असा भास झाल्याचेही सुर्वे यांनी सांगितले.
या स्पर्धेत एकूण कोल्हापूर शहरातील ४५ तरुण मंडळे सहभागी झाले होते. यामध्ये प्रमुख प्रथम पुरस्कार हा हिंदवी ग्रुप विचारेमाळ यांनी प्राप्त केला. त्यांनी किल्ले तिकोना हा किल्ला बनविला होता. तर द्वितीय पुरस्कार हा विभागून संध्यामठ तरुण मंडळ(खांदेरी किल्ला) आणि बालमित्र वॉरियर्स मुक्त सैनिक वसाहत (प्रतापगड किल्ला) यांना देण्यात आला तर तृतीय क्रमांक विभागून जय शिवराय तरुण मंडळ ठोंबरे गल्ली (पद्म दुर्ग किल्ला) आणि बावडा एस.पी.ग्रुप मंगळवार पेठ (रोहिडा किल्ला) यांना
देण्यात आला.यामध्ये विशेष पुरस्कार हा संध्यामठ बॉईज (सुवर्णदुर्ग किल्ला)यांना देण्यात आला.तर ज्या मुला मुलींनी किल्ले बांधणी आणि किल्यांची माहिती चांगली मांडली होती त्यांचा वैयक्तिक सत्कार करण्यात आला.यामध्ये जय शिवराय मित्रमंडळ दौलतनगर मुलींचा ग्रुप,राजनंदिनी राजमाळे कार्टून ग्रुप कदमवाडी (किल्ले राजहंस),महाकाली भजनी मंडळ स्वराज्य पाटील(जंजिरा किल्ला),नृसिंह ग्रुप मेघाली जाधव (किल्ला जंजिरा),प्रॅक्टिस क्लब चैतन्य पाटील(किल्ला पुरंदर,वज्रगड) आदींना शिवमूर्ती व प्रशस्तीपत्र देण्यात आली.याचबरोबर उतेजनार्थ बक्षीस हे टायगर ग्रुप मंगळवार पेठ स्वराज्य साळोखे (किल्ला प्रतापगड),यंगस्टर ग्रुप भोसलेवाडी (किल्ला वासोटा),सदिच्छा तरुण मंडळ (किल्ला कोईगड),आक्रमक तरुण मंडळ शुक्रवार पेठ(किल्ला सुवर्णदुर्ग)आदींना बक्षीसे देण्यात आली.यावेळी मेघाली जडगव,स्वराज पाटील,सिद्धी जाधव आदी मुलांनी शिवाजी महाराज यांचे विचार मांडले.यावेळी आभार युवासेना जिल्हा युवा अधिकारी मनजीत माने यांनी मानले.यावेळी परीक्षक म्हणून सूरज ढोली हर्षल सुर्वे यांनी काम पाहिले ढोली यांचा शिवमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संतोष चौगुले,इंद्रनील पाटील,इंद्रजित पाटील,विजय दरवाण, आदिल पवार,संकेत खोत,सागर पाटील,अर्जुन वाघ,सूचित पोतदार आदी उपस्थित होते.