महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्ह्यात अडीच हजार सदस्य संपामध्ये सहभागी
कोल्हापूर/प्रतिनिधी : विविध कामगार व शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशनच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या संपामध्ये सर्व केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व कामगार संघटनांच्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला .
त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अडीच हजारांहून अधिक शिक्षक प्रत्यक्ष संपामध्ये सहभागी होते .आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी व शहरांमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये शिक्षक सहभागी झाले .केंद्र शासनाने केजी टू पीजी मोफत शिक्षण सार्वजनिक खर्चातून आणि सार्वजनिक व्यवस्थेतून दिले पाहिजे त्याच बरोबर नवीन शैक्षणिक धोरण रद्द करून सर्वसमावेशक धोरण आखावे व जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करावी या व अन्य मागण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व कामगारांच्या बरोबर संपात सहभागी झाले होते. यामध्ये शिक्षक समितीचे न पा/ मनपा राज्यप्रमुख सुधाकर सावंत ,राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर राज्य ऑडिटर राजेंद्र पाटील, महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे, जिल्हाप्रमुख दिपाली भोईटे ,शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगांवे, जिल्हा नेते कृष्णात कारंडे ,सुरेश कोळी ,सुभाष धादवड, उत्तम कुंभार, वसंत आडके ,प्रकाश पाटील, फारुख डबीर ,संदीप जाधव ,विठ्ठल दुर्गुळे,अनिल शेलार,सुनील परीट ,युवराज सरनाईक, विलास पोवार, राजाराम पाटील ,डॉ. स्वाती खाडे ,बुढेसाहेब पालेगार , आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.