Wednesday, December 11, 2024
Home ताज्या आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज महाराष्ट्र राज्यातील सर्वच आमदारांचा शपथविधी विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या नूतन आमदारांनी भगवे फेटे परिधान करून विधिमंडळात प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले. शपथविधी सुरु झाल्यानंतर नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांनी अनोख्या अंदाजात “आमदारकीची” शपथ घेतली यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सर्वच आमदारांनी दाद दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून, शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना अभिवादन करून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली घेतली. यास विधासभेत उपस्थित सदस्यांनी विषेश दाद दिली.

Previous articleवालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन
Next articleनिसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे, असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झालेल्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. किरण आणि अनघा पुरंदरे या दांपत्याचा जीवन प्रवास, त्यांची निसर्गाबद्दलची ओढ आणि तळमळ पाहून, श्रोते अक्षरशः भारावून गेले. गेल्या ३० वर्षाहून अधिककाळ, किरण पुरंदरे हे निसर्ग आणि पक्षी अभ्यासक म्हणून काम करतायत. भंडारा जिल्हयातील जंगल व्याप्त आदिवासी बहुल गावात राहणार्‍या पुरंदरे दांपत्यानं, निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलाय. शिवाय गोंड आदिवासी महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करत, त्यांच्या पारंपारिक कलांना चालना देतायत. मुळचे पुण्याचे पुरंदरे दांपत्य, आता पुर्णवेळ आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करतायत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून, शुक्रवारी या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. रोटरीचे माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते आणि बी.एस. शिंपुकडे यांच्या उपस्थितीत, पुरंदरे यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आलं. मानपत्राचं वाचन पत्रकार अश्‍विनी टेंबे यांनी केलं. यावेळी सत्काराला उत्तर देताना, पुरंदरे यांनी पीटेझरी- निसर्ग आणि संस्कृतीचा प्रितीसंगम ही चित्रफित दाखवून व्याख्यान दिलं. त्यातून त्यांची तळमळ दिसून आली. गेल्या काही वर्षात चिमणीचं अस्तित्व कमी होत चाललंय. या पृथ्वीवर आधी पशुपक्ष्यांचा हक्क आहे, मग माणूस अधिकार गाजवू शकतो. पृथ्वीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनीच वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकानं जाणीव पूर्वक काम करावं, असं किरण पुरंदरे यांनी आवाहन केलं. दरम्यान कोल्हापूरातील रमेश खटावकर यांनी पुरंदरे दांपत्याच्या कार्याला हातभार म्हणून एक लाख रूपयांचा निधी दिला. तर कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुरंदरे दांपत्याला आर्थिक पाठबळ द्यावं, असं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र पोंदे, मनिषा चव्हाण, ज्योती तेंडुलकर, अनिता जनवाडकर, ॠषिकेश जाधव, मिनल भावसार, सोनाली चौधरी, ज्योती रेड्डी, जगदिश चव्हाण, अमोल देशपांडे, भाग्यश्री देशपांडे, करूणाकर नायक, भारती नायक, अनुपमा खटावकर, प्रतिभा शिंपुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

Recent Comments