Wednesday, December 11, 2024
Home ताज्या साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक...

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

 

दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या एमएसपीबद्दल मुद्दा उपस्थित केला. २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत, ३१०० रूपये प्रतिक्विंटल आहे. एकीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची एफआरपी वाढवली जाते. तर दुसरीकडे साखरेचा उत्पादन खर्च, कर्मचारी पगार, कर्जाचे व्याज यामुळं साखर कारखान्यांवरील आर्थिक बोजा वाढतोय. परिणामी साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली आहे.राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज देशातील साखर कारखान्यांसमोरील प्रश्नांची मांडणी केली. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देण्यासाठी एफआरपीची रक्कम दरवर्षी वाढते. पण साखरेची एमएसपी वाढत नाही. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आल्याकडं खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत देशातील साखर उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतो. देशातील १० कोटींपेक्षा अधिक ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कुटुंबांसाठी साखर उद्योग उदरनिर्वाहाचे साधन आहे. संपूर्ण देशात सुमारे ५५० साखर कारखाने असून, या उद्योगातून सुमारे साडेपाच लाख लोकांना रोजगार मिळतो. भारतात दरवर्षी सुमारे ३६० ते ४०० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होते. २०२२-२३ या वर्षात सुमारे ६० लाख टन साखर निर्यात केली. तर देशांतर्गत साखरेचा वापर सुमारे २६० लाख टन आहे. ऊस पिकाचे एकूण मूल्य ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण हा संपूर्ण उद्योग हवामान बदलावर अवलंबून असतो. त्यातून साखर उद्योगाचे अनेकदा नुकसान होतंय. एकिकडे केंद्र सरकारने उसाची किंमत निश्चित केली आहे. एफआरपीमुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा फायदा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने साखरेसाठी एमएसपी म्हणजे किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंंटल ठरवला आहे. पण गेल्या ७ वर्षांपासून एमएसपी दरात वाढ नाही. एकीकडे एफआरपी दरवर्षी वाढत असताना, साखरेचा एमएसपी ३१०० रुपयांपर्यंत मर्यादित असल्याने साखर कारखानदारांचे मोठे नुकसान होत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. साखरेचा उत्पादन खर्च, काढणी, वाहतूक, कारखान्याची देखभाल, कर्मचारी पगार, व्याज असे अनेक खर्च साखर कारखान्यांना करावे लागतात. ३१०० रुपयांच्या एमएसपीमध्ये हा सर्व खर्च भागवणे कारखान्यांना शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या एमएसपीमध्ये ४२०० रुपयांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी इस्मा, नॅशनल शुगर फेडरेशन आणि महाराष्ट्र साखर संघांनी केली आहे. त्यातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दोन पैसे जादा मिळतील आणि तोट्यात असलेल्या साखर कारखान्यांना उभारी मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

Previous articleनिसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे, असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झालेल्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. किरण आणि अनघा पुरंदरे या दांपत्याचा जीवन प्रवास, त्यांची निसर्गाबद्दलची ओढ आणि तळमळ पाहून, श्रोते अक्षरशः भारावून गेले. गेल्या ३० वर्षाहून अधिककाळ, किरण पुरंदरे हे निसर्ग आणि पक्षी अभ्यासक म्हणून काम करतायत. भंडारा जिल्हयातील जंगल व्याप्त आदिवासी बहुल गावात राहणार्‍या पुरंदरे दांपत्यानं, निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलाय. शिवाय गोंड आदिवासी महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करत, त्यांच्या पारंपारिक कलांना चालना देतायत. मुळचे पुण्याचे पुरंदरे दांपत्य, आता पुर्णवेळ आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करतायत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून, शुक्रवारी या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. रोटरीचे माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते आणि बी.एस. शिंपुकडे यांच्या उपस्थितीत, पुरंदरे यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आलं. मानपत्राचं वाचन पत्रकार अश्‍विनी टेंबे यांनी केलं. यावेळी सत्काराला उत्तर देताना, पुरंदरे यांनी पीटेझरी- निसर्ग आणि संस्कृतीचा प्रितीसंगम ही चित्रफित दाखवून व्याख्यान दिलं. त्यातून त्यांची तळमळ दिसून आली. गेल्या काही वर्षात चिमणीचं अस्तित्व कमी होत चाललंय. या पृथ्वीवर आधी पशुपक्ष्यांचा हक्क आहे, मग माणूस अधिकार गाजवू शकतो. पृथ्वीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनीच वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकानं जाणीव पूर्वक काम करावं, असं किरण पुरंदरे यांनी आवाहन केलं. दरम्यान कोल्हापूरातील रमेश खटावकर यांनी पुरंदरे दांपत्याच्या कार्याला हातभार म्हणून एक लाख रूपयांचा निधी दिला. तर कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुरंदरे दांपत्याला आर्थिक पाठबळ द्यावं, असं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र पोंदे, मनिषा चव्हाण, ज्योती तेंडुलकर, अनिता जनवाडकर, ॠषिकेश जाधव, मिनल भावसार, सोनाली चौधरी, ज्योती रेड्डी, जगदिश चव्हाण, अमोल देशपांडे, भाग्यश्री देशपांडे, करूणाकर नायक, भारती नायक, अनुपमा खटावकर, प्रतिभा शिंपुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Next articleप्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

Recent Comments