Wednesday, December 11, 2024
Home ताज्या कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिर हे कोल्हापूर शहराच्या सर्वात मोठ्या कपिलतीर्थ मंडई येथे वसलेले आहे परंतु या मंदिरा भोवती वर्षानुवर्षे टपऱ्या, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. महापालिका प्रशासनास वारंवार सूचना करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच या मंदिराचे महात्म्य श्री महालक्ष्मी मंदिराशी सलग्न असल्यामुळे यामंदिराची स्वच्छता, भोवताली असणारे अतिक्रमण, या मंदिराचे महात्म्य सांगणारे फलक ई. गोष्टींकडे महापालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये म्हणाले, कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिराची जी दुरावस्था झाली आहे ती अतिशय दयनीय आहे तसेच भक्त लोकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी जो बाहेरील मार्ग आहे तो संपूर्णत:अतिक्रमनाच्या विळख्यात आहे. मंदिराच्या शिखरावर झाडे झुडपे वाढलेली आहेत मंदिराच्या भोवती असणारी गटर्स कधीच साफ केली जात नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून महापालिका प्रशासनाच्या वरील विषयाशी संबंधित विभागांना सूचना देऊन कडक कारवाई करावी असे नमूद केले.
या निवेदनाला उत्तर देताना उपायुक्त श्रीमती साधना पाटील म्हणाल्या, येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कपिलतीर्थ मंडई येथे येऊन मंदिर व परिसर अतिक्रमण मुक्त करू असे अस्वस्थ केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे, संग्राम जरग, विजय आगरवाल, प्राची कुलकर्णी, युवराज शिंदे, भारत भोसले, सचिन पोवार, अनिश पोतदार ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

Recent Comments