Sunday, December 22, 2024
Home ताज्या कासारवाडी येथील बेकायदेशीर दगडखाणीची न्यायालयाने घेतली गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्री-सदस्यीय चौकशी...

कासारवाडी येथील बेकायदेशीर दगडखाणीची न्यायालयाने घेतली गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्री-सदस्यीय चौकशी समिती

कासारवाडी येथील बेकायदेशीर दगडखाणीची न्यायालयाने घेतली गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्री-सदस्यीय चौकशी समिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कासारवाडी ग्रामपंचायत भागात तब्बल पाचशे एकर वनजमिनीवर अनियंत्रित व बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. १९५३ साली वन विभागाने संरक्षित वन म्हणून जाहीर झालेल्या जमिनीवर व कासरवाडी ग्रामपंचायतच्या गायरान जमिनीवर हजारो मेट्रिक टनाचा मुरूम व दगड उपसा अनेक वर्षापासून सुरू आहे. हजारो ट्रक उपसा येथील दगडखणी मधून दररोज बेकायदेशीर जे सी बी लावून लावून आणि ब्लास्टिंग द्वारे केला जातो तरीही सगळ्या यंत्रणा झोपल्या आहेत का असा थेट प्रश्न याचिकेतून मांडलेला आहे. या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण येथे कासारवाडी ग्रामपंचायतीने ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या पर्यावरणहित याचिकेची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ; जिल्हाधिकारी; मुख्य वनसंरक्षक अशी त्रिसदस्यीय चौकशी समिती दिनांक ९ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी नियुक्त केली असून यासंदर्भात चौकशी अहवाल दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. कासारवाडीतील गट क्रमांक 630/1-A+ B ही जमीन बेकायदेशीर दगडखान चालविणाऱ्यांनी पूर्णपणाने ताब्यात घेतली असून या दगडखाणी सुरू असण्यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलेला आहे.
पर्यावरणाची कायमस्वरूपी हानी व निसर्गाची ओरबाडणूक बंद व्हावी, कासारवाडी ग्रामस्थांना होणारा ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, सतत उडणाऱ्या धुळीमुळे होणारी शेतीची व पिकांची हानी, येथील लोकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचिकेतून मांडण्यात आलेले आहेत. आम्ही कुणाविरोधात ही केस केलेली नसून पर्यावरण रक्षणासाठी ही केस सगळ्या ग्रामस्थांनी केली असल्याचे कासारवाडीच्या सरपंच शोभाताई खोत यांनी सांगितले. वनविभागाने त्यांची जमीन ताब्यात घ्यावी, गायरान जमीन गावासाठी मोकळी करून द्यावी, ज्यांनी पर्यावरणा चे नुकसान केले त्यांच्याकडून पर्यावरण नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अश्या काही महत्वाच्या मागण्या याचिकेतून करण्यात आल्याचे ॲड असीम सरोदे यांनी सांगितले.                                                              पत्रकार परिषदेसाठी अँड. असीम सरोदे अँड.हेमा काटकर, सरपंच शोभाताई खोत, ग्रामपंचायत सदस्य मनीषा जयसिंग यादव, सामाजिक कार्यकर्ते युवराज कदम व अनेक ग्रामस्थ हजर होते. ज्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी येथील दगडखाणी सुरू ठेवण्यासाठी आजपर्यंत मदत केली या बेकायदेशीर दगडखणीणींकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात अशी शक्यता सुद्धा असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments