Sunday, December 22, 2024
Home ताज्या सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली/प्रतिनिधी :स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांनाआजराष्ट्रीय पुरस्काराने स्मानित करण्यात आले. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधूनकेंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून सरपंच संवाद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावतआणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गत अनेक निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपुर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा २० जिल्ह्यांना आज राष्ट्रीय पुरस्काने सन्मानित करण्यात आले.                           यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठरविलेल्या निकषांमध्ये १०० % हगणदारी मुक्त जिल्हा असणे, वयैक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेविषयी स्थानिकांमध्ये अधिकाधिक जागृकता निर्माण करणे, त्यांना योग्य ती माहिती पुरविणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्याशी संवाद वाढविणे या बांबीचा समावेश आहे.                            नाशिक जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागरआणि कोल्हापूर जिल्हा‍ परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनीदूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्याशी सवांद साधला.                         नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद व्यक्त करीत संबधित जिल्हा परिषदांच्यापदाधिकारी, अधिकारी व सर्व यंत्रणेने केलेल्या श्रमाची ही फलश्रुती असल्याचे व्यक्त केले. २ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते, ग्रामीण स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र यापुढेही अग्रेसरच राहील आणि राज्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावेल यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments