प्रा जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा २१ रोजी कोल्हापुरात मेळावा
कोल्हापूर/प्रतिनिधी : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,आणि मित्रपक्षाचा संयुक्त मेळावा शनिवार दिनांक २१नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ठीक ०२.०० वाजता महासैनिक दरबार हॉल सर्किट हाऊस जवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे होणार आहे.
या मेळाव्यास ना.जयंत पाटील (जलसंपदामंत्री )ना. हसन मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री,) ना. सतेज पाटील (पालकमंत्री, गृहराज्यमंत्री,) ना, राजेंद्र पाटील यड्रावकर (आरोग्य राज्यमंत्री,) खा.संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ.पी.एन.पाटील आ. चंद्रकांत जाधव,आ.ऋतुराज पाटील,आ.राजुबाबा आवळे, आ.प्रकाश आबीटकर, आ. राजेश पाटील, माजी.आ.राजेश क्षीरसागर, हे उपस्थित उपस्थितीत राहणार आहेत.