कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने “केएमए – कॉन २०२४ दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे” आयोजन
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या शिखर संस्थेच्या वतीने केएमए – कॉन २०२४ ही वैद्यकीय परिषद येत्या १९ आणि २० ऑक्टोंबर रोजी कोल्हापुरात होणार आहे. परिषदेचे उद्घाटन दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी शनिवारी सायंकाळी ६.०० वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे.”डॉक्टर बियोंड मेडिसिन ३६० ” असे यावर्षीच्या परिषदेचे ब्रीदवाक्य असून केएमए-कॉन परिषदेला यंदा विशेष महत्त्व आहे. अशी माहिती मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल कोडोलीकर आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिपक जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. १०० वर्षांच्या वारशासह, केएमएने वैद्यकीय समुदायाच्या प्रगतीसाठी आणि रुग्ण उपचारासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. या वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज नरवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.याचबरोबर दोन दिवसीय चालणाऱ्या या वैद्यकीय परिषदेमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होणार आहे. वैद्यकीय आणि नैसर्गिक दृष्टीकोनांसह विविध जीवन पद्धतींचे ज्ञान एकत्रित करून आरोग्य, रोग या दैनंदिन आव्हानांना डॉक्टरांनी कसे सामोरे जायचे यावर विशेष चर्चा होणार आहे. परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वजन नियोजन आणि नियंत्रण, मेडीटेशन, वैद्यकीय सेवेतील कायदेशीर तरतुदी, डॉक्टरांकरिता आर्थिक नियोजन या विविध विषयांचा समावेश आहे.या परिषदेस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील पाचशे हुन अधिक डॉक्टर एकत्र येऊन “आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार” या उपचार पद्धतीच्या माहितीची देवाणघेवाण करतील. या वर्षी डॉ. अतुल जोगळेकर पुरस्काराने मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध भूलतज्ञ शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अवयव दानाकरिता जनजागृती रॅलीचे आयोजन २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत सयाजी हॉटेल ते शिवाजी विद्यापीठ या मार्गाने करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला केएमएचे सचिव डॉ. शितल देसाई, परिषदेच्या सह- अध्यक्षा डॉ. सरोज शिंदे,डॉ. अर्चना पवार, परिषदेच्या सचिव डॉ. सरोज शिंदे, वृत्त प्रवक्ते डॉ.प्रवीण नाईक,डॉ . आशा जाधव,डॉ. स्नेहलदत्त खाडे, डॉ. महावीर मिठारी, डॉ. ए.बी पाटील, डॉ. सूर्यकांत मस्कर, डॉ. कृष्णा केळवकर,डॉ. अभिजीत तगारे, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ.आर.एम. कुलकर्णी, डॉ. प्रवीण वडगावे, डॉ.आश्विनी पाटील उपस्थित होते.