पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली
इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिका आणि पोलीस व जिल्हा प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते.याला चांगला प्रतिसाद मिळाला.यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकी वेळी सार्वजनिक मंडळांनी चारही विभागीय कार्यालय अंतर्गत १८२ घरगुती व मंडळांच्या लहान मूर्तीसह १०१५ गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी विसर्जित केल्या. या सर्व मुर्त्या महापालिकेच्या वतीने संकलित करुन इराणी खणीमध्ये पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेला अर्पण केलेल्या आणि इराणी खन येथे सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या १०३५ मोठ्या गणेश मूर्ती व ११.१ लहान गणेश मुर्ती अशा २१३६ गणेश मूर्ती इराणी खण येथे पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक नियोजन पध्दतीने व शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले. हे विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, आरोग्य, पवडी, सफाई, विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन जवान, वैद्यकीय पथक, व्हाइट आर्मी, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी सलग दिवस व अहोरात्र काम केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार प्रशासकांनी व्यक्त केले.
शहरातील मुख्य गणेश विसर्जन मार्गावर विविध पक्षांच्या वतीने बूथ लवण्यात आले होते.याठिकाणी मंडळांचे मानाचे श्रीफळ व पान सुपारी देऊन स्वागत पर आभार मानण्यात आले.
पापाची तिकटी टीम व क्रांतिवीर भगतसिंग येते वाईट आर्मी रेस्क्यू फ्रेंड सर्कल या मंडळांची शेवटची गणपतीची आरती पहाटे ४.१५ वाजता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्य मिरवणूक मार्गावरून येणाऱ्या शेवटच्या गणेश मुर्तीचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी व शहर पोलिस उप-अधिक्षक अजित टिके यांच्या हस्ते इराणी खन येथे आरती करण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, महापालिकेचे व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इराणी खन येथे शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या शेवटच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.अनेक आकर्षक गणेश मूर्ती पाहण्यासाठी मुख्य मिवणुकित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान महापालिकेच्यावतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील स्वागत मंडपामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी व इतर अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी व रोप देऊन स्वागत करण्यात आले. पापाची टिकटी येथील स्वागत मंडपात २८४ गणेश मंडळांची नोंद झाली असून निर्माण चौक येथील पर्यायी मिरवणूक मार्गावरील महापालिकेच्या स्वागत मंडपात ३१३ गणेश मंडळांची नोंद झाली.
महापालिकेची सर्व यंत्रणा २५ तासाहून अधिक काळ राबली
महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर सर्व यंत्रणा २५ तासाहून अधिक काळ राबली. विसर्जना पूर्वी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडूजी, अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आले होते. विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी मोठे हॅलोजन लावून लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विसर्जन स्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. मिरवणूक मार्गावर व इराणी खण येथील विसर्जनाच्या स्थळी वैद्यकीय पथके नेमण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मुर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे १० तराफे, ४ क्रेनची व ३२० हमालांची व्यवस्था करण्यात आली होती. हे हमाल ओळखण्यासाठी त्यांना रिफ्लेक्टर जॅकेट देण्यात आले होते. महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी बंदिस्त बॅरिकेट्स लावण्यात आले होते.विसर्जनादरम्यान आरोग्य विभागाकडून विसर्जनाच्या ठिकाणी आलेले ३५ मे.टन. १० डंपरद्वारे गोळा करण्यात आले. गोळा झालेले निर्माल्य उठाव करून खत प्रक्रिया करण्यास पाठविण्यात आले. मिरवणूक मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागाचे २५०० कर्मचारी, ७० टँम्पो ३२० हमाल, ५ जे.सी.बी., ७ डंपर, ४ टॅक्टर, ४ पाण्याचे टँकर, २ बुम, ६ ॲम्बुलन्स व १० फलोटींगचे तराफे अशी व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी इराणी खण येथे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकि अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी,विद्युत अभियंता अमित दळवी, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी २५ तासाहून अधिक तास काम करून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे विसर्जन यशस्वीरित्या पार पाडले.