Monday, December 23, 2024
Home ताज्या थेट पाईपलाईन योजनेची प्रलंबित कामे मार्गी लावा -महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

थेट पाईपलाईन योजनेची प्रलंबित कामे मार्गी लावा -महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

थेट पाईपलाईन योजनेची प्रलंबित कामे मार्गी लावा -महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर/प्रतिनिधी : थेट पाईपलाईन योजनेतील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून योजनेच्या कामाला गती द्या, असे निर्देश महपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी संबंधितअधिका-यांना दिले.महपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी काळम्मावाडी येथील जॅकवेल, राजापूर व नरतवडे येथील पाईप लाईन आणि पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, या प्रकल्प अधिकारी हर्षजीत घाटगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन्यजीव व वन विभाग व महावितरण विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेऊन प्रकल्पाची कामे प्राधान्याने व्हावीत, यासाठी समयबध्द कार्यक्रम निश्चित करण्याची सुचना प्रकल्प अधिकारी यांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली.
महपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सुरुवातीस राधानगरी तालुक्यातील राजापूर येथील जॅकवेलच्या कामाचा आणि १८०० मीमी व्यासाच्या गुरुत्ववाहिनी पाईपलाईनच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन आढावा घेतला. धरण क्षेत्रातील इन्स्पेक्शन वेल , इंटेक वेल, कनेक्टिंग पाईप, जॅकवेल इत्यादी कामे पूर्ण करण्याच्या कालावधीबाबत नियोजित वेळेचा बार चार्ट तयार करण्याची सूचनाही प्रकल्प अधिकारी यांना केली. तसेच वन विभागाशी संबंधित गट नंबर ५१ व गट नंबर १७४ मधील प्रलंबित कामाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.
नरतवडे येथील चालू असलेल्या पाईपलाईन कामाची तसेच योजनेअंतर्गत पुईखडी येथे बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची पहाणीही महपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केली. ठेकेदार जी.के.सी. कंपनीने ही कामे गतीने करण्यासाठी नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी उप जल अभियंता रामचंद्र गायकवाड, शाखा अभियंता संजय नागरगोजे तसेच योजनेचे तांत्रिक सल्लागार युनिटी कन्सल्टंट, पुणे यांचे प्रतिनिधी विजय मोहिते, आर बी पाटील आणि ठेकेदार जी.के.सी.प्रोजेक्टस्. लि., हैद्राबाद, यांचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments