सिंह राशीतून होणार उल्का वर्षाव पाहण्याची संधी
कोल्हापूर/प्रतिनिधी : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सिंह राशीतून होणार उल्का वर्षाव पाहण्याची संधी ३० नोव्हेंबर मिळणार आहे. दिनांक १७ आणि १८ च्या रात्री सर्वात ज्यास्त उल्कावर्षाव अनुभवण्याची मिळणार आहे. त्यामुळे आजची रात्र अवकाश संशोधक आणि नागरिकांसाठी पर्वणीची ठरणार आहे. पृथ्वी टेम्पल-टटल धूमकेतू ने सोडलेल्या सोडलेल्या धुळीच्या कानाच्या पट्यातून जेव्हा जाते तेव्हा हे धुळीचे कण पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात. पृथ्वीपासून १२० ते ८० किलोमीटर च्या दरम्यान वातावरणातील हवेच्या बरोबर झालेल्या घर्षणामुळे त्यांचे ज्वलन होते, त्यावेळीच त्यांचा वेग ताशी ११ ते ७२ किमी/सेकंद इतका असतो. साधारणपणे १० ते १५ सेकंदापर्यंत ह्या उल्का जमिनीच्या दिशेने येताना आपल्याला दिसतात . त्यानंतर त्यांचे राखेत रूपांतर होते. त्यातील काही मोठ्या आकाराच्या उल्का संपूर्णपणे न जळता जमिनीपर्यंत पोहचतात. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी निरभ्र आकाश, सिंह राशी ओळखण्यासाठी आकाश नकाशा व सहनशीलतेची गरज आहे. सर्वप्रथम शहरातील कृत्रिम प्रकाशापासून दूर व उंच ठिकाण निवडावे जेणेकरून स्वच्छ आणि संपूर्ण आकाश दिसेल,. शक्यतो एखाद्या उंच इमारतीच्या छतावरुन निरीक्षण करावे. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी काही तास लागणार असल्याने बसण्यासाठी खुर्ची किंवा झोपून निरीक्षण करण्यासाठी चटई इत्यादींचा उपयोग करावा.आकाश नकाशाच्या साहाय्याने सिंह राशी ओळखून त्या दिशेने निरीक्षण करत राहावे.तासाला साधारणपणे १५ उल्का सिंह राशीच्या मधुन बाहेर पडताना दिसतील. सूर्य मावळल्या पासून ते पहाटे सूर्योदय पर्यंत पर्यंत उल्कावर्षाव ३० नोव्हेंबर पर्यंत पाहता येईल. अशी माहिती अवकाश संशोधन केंद्र,पन्हाळा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर याचे समन्वयक .डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली आहे