महापालिका पथकाकडून गेल्याआठवड्यात ४१७५ जणांकडून ४ लाख ६२ हजार दंड वसूल,कोरोना रोखण्यासाठी मास्क व सामाजिक अंतराचे पालन करा – आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून ४ हजार १७५ जणांकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच रात्री ९ नंतर आस्थापना सुरु न ठेवणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल गेल्या आठवड्यात म्हणजे दिनांक ११ ते १७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ४ हजार १७५ जणांकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, हा उद्देश असल्याचेही आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या.
यामध्ये दिनांक ११ ते १७ नोव्हेंबर २०२० या सात दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाने ४ हजार १७५ जणांकडून वसूल केलेल्या ४लाख ६२ हजार ८०० रुपयांच्या दंडामध्ये दि. ११ नोव्हेंबर रोजी ६७० जणांकडून ७८ हजार ६०० दि. १२ नोव्हेंबर रोजी ५९८ जणांकडून ६६ हजार ३००, दि.१३ नोव्हेंबररोजी ५३० जणांकडून ६५ हजार ३००, दि. १४ नोव्हेंबररोजी ४३७ जणांकडून ४९ हजार १००, दि. १५ नोव्हेंबररोजी ७०५ जणांकडून ७५ हजार १००, दि. १६ नोव्हेंबररोजी ७३५ जणांकडून ७३ हजार १०० आणि दि.१७ नोव्हेंबररोजी ५०० जणांकडून ५५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने नो मास्क नो एंन्टी ही मोहिम शहरात गतीमान केली असून विनामास्क फिरणारे तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.