खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासमवेत इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी यांची विशाळगड गजापूर गावास भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासमवेत आज किल्ले विशाळगड परिसरातील गजापूर गावास भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यांच्याशी संवाद साधला तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून दिलासा दिला.किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून संयमी कोल्हापूरकर धर्मांधतेच्या राजकारणापासून दूर राहून बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर अनुकरणीय आदर्श ठेवतील याची खात्री आहे. असे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले.
याप्रसंगी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सत्यजित पाटील सरुडकर राष्ट्रवादीचे व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कादर मलबारी, भारतीताई पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.