माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत
रामानंदनगर ते जरगनगर जनजागृती रॅली संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत आज शहरातील प्रभाग क्रमांक ४३ मधील जवाहरनगर चौक ते वायपी पोवारनगर मेनरोड ते शास्त्रीनगर चौक परिसरात आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची जनजागृती रॅली काढण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत जवाहरनगर चौक ते वायपी पोवारनगर मेनरोड ते शास्त्रीनगर चौक परिसरात आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले.
या रॅलीत महापालिकेचे विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, प्रभाग मुकादम राहूल आवळे तसेच स्वच्छतादुत अमित देशपांडे यांच्यासह प्रभाग कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले.