शहरातील मृत व्यक्तिंचे दहन/ दफन करण्यासाठी
आता मेडीकल प्रॅक्टीशनर किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र चालणार
-आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरात घडणाऱ्या मृत व्यक्तिंचे दहन अथवा दफन करण्यासाठी कोणत्याही रजिष्टर्ड मेडीकल प्रॅक्टीशनर अथवा खाजगी किंवा शासकीय दवाखान्यातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर आता स्मशानभूमी अथवा दफनभूमी येथे मृत व्यक्तिंचे अंत्यसंस्कार होऊ शकतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज दिली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ रविवार १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आला आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात घडणाऱ्या मृत व्यक्तिंचे दहन अथवा दफन नगरसेवकांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरुन करण्यात येत होते, यापुढे नागरिकांच्या सोयीसाठी सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२० पासून नुतन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत, शहरात घडणाऱ्या मृत व्यक्तिंचे दहन अथवा दफन करण्यासाठी कोणत्याही रजिष्टर्ड मेडीकल प्रॅक्टीशनर अथवा खाजगी किंवा शासकीय दवाखान्यातील वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राहय घरण्यात येणार आहे.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील एखाद्या नागरीकाचा घरी नैसर्गीक मृत्यू झाल्यास त्याला स्थानिक नगरसेवकाकडून प्रमाणपत्र दिले जात होते, परंतू सभागृहाचा कार्यकाळ आज रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी नजीकचा रजिष्टर्ड मेडीकल प्रॅक्टीशनर अथवा खाजगी किंवा शासकीय दवाखान्यातील वैद्यकिय अधिकाऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, तसेच अशा प्रकारचे मृत्यू प्रमाणपत्र नागरीकांनी मागणी केल्यास रजिष्टर्ड मेडीकल प्रॅक्टीशनर अथवा खाजगी किंवा शासकीय दवाखान्यातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आवश्यक ती तपासणी करुन मृत्यू प्रमाणपत्र द्यावे, या प्रमाणपत्राच्या आधारे स्मशानभूमी अथवा दफनभूमी येथे मृत व्यक्तिंचे अंत्यसंस्कार होतील, याची सर्व नागरीकांनी नोंद घेऊन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.