शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शाहू महाराजांना संसदेत पाठवा – संयोगिताराजे छत्रपती
गारगोटी/ प्रतिनिधी : पाटगाव प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यात मोठी हरितक्रांती झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात या प्रकल्पामुळे आर्थिक उन्नती पोहोचली आहे. या प्रकल्पाचे पाणी अन्य ठिकाणी गेले तर शेतकरी देशोधडीला लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाणी इतर कुणी पळवू नये यासाठी दिल्लीत लढायला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शाहू महाराजच खासदार होणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.तिरवडे येथे इंडिया आघाडी व काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ सूर्यकांत मंगल कार्यालय तिरवडे येथे युवा नेते, बिद्री चे संचालक सत्यजितराव जाधव यांच्या नेतृत्वा खाली संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात महिला मेळावा संपन्न झाला.
संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती म्हणाल्या की, लोकसभेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलासाठी वेगवेगळे लघु व मध्यम प्रकल्प आणू . त्यामधून शेतकऱ्यांची, महिलांची उन्नती होईल असे सर्व कार्यक्रम राबवण्यात येतील. छत्रपती शाहू महाराज यांना मतदान करून विकासाच्या प्रवाहात सामील व्हा.शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले , मोदी सरकार हे दिनदलितांचे सरकार नसुन बड्या कंपन्या व उद्योगपतींचे सरकार आहे,शेती मालाला हमीभाव मिळायचा असेल तर मोदी सरकार हटवा,खोके साठी तत्वे गाडणारी ही मंडळी कसला विकास करणार हा मोठा प्रश्न असुन मोदीचे सरकार शेतकरी विरोधी आहे.
तिरवडे सरपंच , भुदरगड महिला काँग्रेस अध्यक्षा सौ शुभांगी जाधव बोलताना म्हणाल्या येथील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा .मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान करून शाहू महाराज यांना निवडून देवून त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा आहे आवाहन केलं.माजी उपसभापती सत्यजित राव जाधव म्हणाले की, छत्रपती घराण्याला मतदान करण्याची सुवर्णसंधी आम्हाला लाभले असून भुदरगड पश्चिम विभागातून छत्रपती शाहू महाराजांना मताधिक्य देऊ. माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. स्वरूपा जाधव म्हणाले की, जिल्हा परिषद फंडाच्या माध्यमातून या भागात आम्ही कायापालट केला असून त्या संपर्काच्या माध्यमातूनच लोकसभेलाही मताधिक्यामध्ये आघाडी घेऊ.यावेळी देवर्डेच्या सरपंच सौ अनिता कोटकर ,मुबारक शेख , शिवसेनेचे नेत्या मसुरेकर यांची भाषणे झाली यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात मेळाव्यास उपस्थिती दर्शवली.काँग्रेस महिला अध्यक्षा अनुराधा चव्हाण यांनी प्रास्तविक केले. जिल्हा परिषद मतदार संघातील लोकनियुक्त महिला सरपंच ,उपसरपंच ,बचत गटाच्या महिला,उपस्थित होत्या.विश्वजीत जाधव, तिरवडेचे माजी सरपंच ऋषिकेश जाधव ,विश्वजित जाधव ,तालुका संघ संचालक शहाजी देसाई ,एकनाथ वरंडेकर , अविनाश शिंदे,यांच्यासह महिला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.