विकसित भारतासाठी भाजपला साथ दया – पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोल्हापूर/प्रतिनिधी : इंडिया आघाडी ही देशा विरोधात अजेंडा राबवत आहे पण भाजप लोकसभा निवडणूक देशाच्या विकासासाठी लढत आहे तरी २०२४ च्या निवडणुकीत माझ्या पाठीशी आशीर्वाद देऊन तुमचा आणि देशाचा विकास करण्याची मला संधी देऊन साथ दया असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.येथील तपोवन मैदान येथे महायुतीचे कोल्हापूर व हातकणंगले चे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्य शिल माने यांच्या प्रचारार्थ आयोजित संकल्प सभेत मोदी बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबाबाईला वंदन करून आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीमध्ये केली. मी काशीचा खासदार आहे आणि आज करवीर काशी येथे आलो आहे कोल्हापूर महाराष्ट्रचे फुटबॉल हब असल्याचे नमूद करून विरोधकांवर हल्ला चढवून मोदी यांनी विरोधकांनी राजकारणाचा सेफ गोल केला पण यापुढे तिसऱ्या टप्प्यात होत असलेला मतदानात कोल्हापूरकर गोल करतील,कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शावर चालते त्यामुळे याठीकणची जनता सुज्ञ आहे.यापुढे पुढच्या चारही टप्प्यात विरोधक चारी मुंड्या चीतपट होणार आहेत असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधकांना संधी मिळाली तर पाच वर्षाचे पाच पंतप्रधान करतील पण इंडिया आघाडी सरकारच्या दारापर्यंत ही पोहोचेल का असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस सत्तेवर आल्यावर सीएम रद्द करणार म्हणते पण आपण ते होऊ देणार नाही असा इशारा दिला. तब्बल ५०० वर्षानंतर राम मंदिराचे मंदिर निर्माण झाले राम मंदिर उद्घाटनावरील काँग्रेसने बहिष्कार घातला अशा काँग्रेसला आपण निवडून देणार का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कर्नाटकामध्ये काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी करून टाकले कर्नाटकातील काँग्रेसचे आरक्षणाचे हे मॉडेल देशाला लागू कर इच्छितात पण ते होऊ शकणार नाही काँग्रेसने नेहमीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे. आज नकली शिवसेना काँग्रेस सोबत फिरते अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मोदी यांनी केली आहे.आता जनतेला मुद्रा लोन दहा लाख वरुन वीस लाख केले आहे.महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर विरोधकांचा टांगा पलटी होऊन त्यांचे उमेदवार पराभव होतील असा टोला लागला. कोल्हापूर मधील उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत असे सांगत देशात फक्त मोदींची आश्वासने नाहीत तर गॅरंटी चालते असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत ठाकरे आणि त्यांचा मुलगा आता पंजाला मतदान करणार आहेत हे दुर्दैव असल्याचे सांगत उभाटाची आता शंभर टक्के काँग्रेस झाली आहे. आता त्यांना हिंदूही म्हणायची लाज वाटते असा जोरदार हल्लाबोल केला. २०२४ मध्ये विरोधकांचे डिपॉझिट गुल होईल असे सांगत आईचा पदर धरून राजकारण करणारा पंतप्रधान आपल्याला नको असे सांगत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यावेळी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना मोदी शिवाय देशाला पर्याय नाही मोदी हे देशातील नव्हे तर जगातील यशस्वी प्रधान मंत्री आहेत त्यांनी या देशातील जनतेला कोरोणाच्या काळात लस आपल्याच देशात उपलब्ध करून जिवंत ठेवले बाहेरील देशांना भारतातील कोट्यावधी लोक मृत्यू पावतील असेच म्हणत होते मात्र मोदींनी हे खोटे ठरवत स्वतः शास्त्रज्ञ यांना घेऊन अभ्यास करून लस तयार केली आणि देश वाचविला आहे अशा पंत प्रधान सोबत आपण राहिले पाहिजे आणि ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे असे सांगितले.यावेळी दोन्ही उमेदवार,रामदास आठवले,पालकमंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे आदींची भाषणे झाली.यावेळी मंत्री उदय सामंत,विनय कोरे,चंद्रकांत दादा पाटील, समरजित घाटगे आदी उपस्थित होते. आभार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी मानले.