खासदार धैर्यशील माने यांचा कोडोलीत दौरा : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,जनसुराज्य शक्ती सक्रीय
वारणानगर / प्रतिनिधी : कोडोली ता. पन्हाळा येथे खासदार धैर्यशील माने यानी केलेल्या संपर्क दौऱ्यात त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या दौऱ्यात खासदार माने यांचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी सर्व ठिकाणी जोरदार स्वागत झाल्याने जनसुराज्य शक्ती पक्ष सक्रीय झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
खा. माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोडोली येथे शिवसेनेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर त्यांनी महायुतीत मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तसेच अन्य स्थानिक गटातील कार्यकर्त्यांना भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला.
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, सुरेश पाटील तसेच रणजीत पाटील,अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, माजी जि. प. सदस्य बी. टी. साळुंखे, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील,कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, कोडोली चे माजी सरपंच शंकर पाटील,नितीन कापरे, माजी उप सरपंच मानसिंग पाटील तसेच माजी सरपंच कै.विद्यानंद पाटील यांचे घरी भेटी दिल्या.
खासदार धैर्यशील माने,आमदार डॉ विनय कोरे यांनी कोडोली येथील प्रवीण शेट्टी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भेट दिली.
यावेळी उपस्थित जिल्हा सचिव ओमकार चौगुले,उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे,उदयसिंह पाटील,कोडोलीचे उपसरपंच प्रविण जाधव भाजपाचे सचिव अविनाश चरणकर व इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खासदार माने यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आजवर केलेल्या विकास कामाची माहिती देवून आपली भूमिका मतदार जनतेपर्यंन्त पोहचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
खासदार धैर्यशील माने यानी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड राजेंद्र पाटील याच्यासह भाजपा – शिवसेनेच्या कार्यकर्त्या समवेत कोडोली व परिसरातील गावांना भेटी देऊन प्रमुख पदाधिकारी तसेच जनतेशी संवाद साधला असून त्यांना प्रतिसाद मिळत आहे.