जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण धुमाळे तर सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे,खजानिसपदी डॉ. गुणाजी नलवडे यांची निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ( जीपीए)कोल्हापूरची सन २०२३ -२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २४ मार्च २०२४ रोजी के. एम ए हॉल बेलबाग येथे सकाळी पार पडली. यावेळी २०२४ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षस्थानी जीपीएचे माजी अध्यक्ष डॉ. राजेश सातपुते उपस्थित होते.यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण धुमाळे तर सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड समितीमार्फत करण्यात आली.यातील इतर कार्यकारीणी सदस्य अशी आहेत.खजानिसपदी डॉ. गुणाजी नलवडे,प्रेसिडेंट ईलेक्ट डॉ. वर्षा पाटील,इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट डॉ. राजेश सातपुते,प्रेसिडेंट ॲडव्हायझरी डॉ. सचिन मुतालिक,सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ,डॉ. शुभांगी पार्टे, व सदस्य म्हणून डॉ. रमेश जाधव,डॉ. शिवाजी मगदूम यांची निवड झाली. तर कार्यकारिणी सदस्यमध्ये डॉ. हरीश नांगरे,डॉ. राजेश सोनवणे, डॉ. दीपक पोवार,डॉ प्रशांत खुटाळे, डॉ. पूजा पाटील, डॉ. विलास महाजन,डॉ. शशिकांत पाटील,डॉ.किशोर निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी मावळते सचिव डॉ.हरीश नांगरे यांनी मागील वर्षाच्या सचिव अहवाल सादर केला व अध्यक्ष. डॉ. राजेश सातपुते यांनी संस्थेचा वर्षभरातील कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. नवनिर्वाचित कार्यकरिणी सदस्यांची यादी सल्लागार समिती चेअरमन डॉ. रमेश जाधव यांनी जाहीर केली.नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे यांनी येणारे वर्षात होणाऱ्या कार्यक्रमाबद्दलचा मानस व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हरीश नांगरे यांनी केले व आभार डॉ. महादेव जोगदंडे यांनी मानले.यावेळी डॉ. उद्यम व्होरा, डॉ. शिवपुत्र हिरेमठ, डॉ.राजेश कुंभोजकर, डॉ.चंद्रकांत सोनवणे, डॉ. बिंदगे, डॉ. पी. पी. शहा, डॉ. शीतल पाटील, डॉ.शिवराज देसाईआणि जीपीए सदस्य उपस्थित होते.