Thursday, November 21, 2024
Home ताज्या कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव व उपाध्यक्षपदी राजन सातपुते...

कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव व उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची निवड

कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव व उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी राजन भारत सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मुख्य लिपिक व्ही. एम. तोडकर होते.कोल्हापूर उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या सन २०२३-२४ ते २०२४-२०२५ या सालाकरीता पदाधिकारी निवडी आज झाल्या. यावेळी अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव तर उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे संचालक चंद्रकात चोरगे, हिंदुराव कामते, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, संजय अंगडी, अशोक जाधव, भरत जाधव, माणिक सातवेकर, सुधाकर सुतार, संगीता नलवडे आदी उपस्थित होते.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, सभासद, फौंड्री उद्योजकांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांचे काम यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे संस्थेचे काम अधिक चांगले करण्याची जबाबदारी माझी आहे. संस्थेच्या संभापूर औद्योगिक वसाहतमधील विजेचा प्रश्न मी सोडवला आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणी आणि शहरात आयटी पार्क डेव्हलपमेंट साठी मी कटिबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments