Sunday, December 22, 2024
Home ताज्या केडीसीसीच्या ७८ शिपायांची क्लार्कपदी नियुक्ती,मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते दिवाळी भेट: १०० ...

केडीसीसीच्या ७८ शिपायांची क्लार्कपदी नियुक्ती,मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते दिवाळी भेट: १००  कोटी नफ्यासह ७००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट

केडीसीसीच्या ७८ शिपायांची क्लार्कपदी नियुक्ती,मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते दिवाळी भेट: १००  कोटी नफ्यासह ७००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना व कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अशा ७८ जणांना बँकेने क्लार्क पदाची नियुक्ती पत्रे दिली. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते बँकेच्या प्रांगणात झालेल्या एका खास कार्यक्रमात या नियुक्ती पत्रांचे वाटप झाले.
यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. मुश्रीफ म्हणाले, दहा वर्षापूर्वी कंत्राटी शिपाई म्हणून सेवेत रुजू झालेल्या या कर्मचाऱ्यांचा पगार पाहून आम्हालाही लाज वाटायची. दोन वर्षांपूर्वी त्यांना शिपाई पदावर कायम सेवेत घेतली होते. त्यातील पदवीधरांची क्लार्क म्हणून नियुक्ती व्हावी, अशी त्यांची मागणी होती.
ते पुढे म्हणाले , बँकेवर पाच वर्षापासून असलेल्या संचालक मंडळाच्या आधीची नऊ वर्ष प्रशासकाची कारकीर्द होती. बँकेवर लागलेला तो एक काळाकुट्ट डाग होता. पाच वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासाने या बँकेचे नेतृत्व माझ्याकडे दिले आणि संचालक मंडळाने ठरविल्यानुसार राज्यातच नव्हे तर सबंध देशात ही बँक अग्रेसर आणली. कर्मचाऱ्यांचे जेवढे निर्णय प्रलंबित होते, ती सर्व निकालात काढले. कर्मचाऱ्यांनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने काम केले त्यातूनच बँकेने ६००० कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला.

चौकट……..
उद्दिष्ट नफा आणि ठेवींचे
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आजचे जिल्हा बँकेचे जे वैभव दिसत आहे, त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या भरवशावरच ३१ मार्च २०२१ अखेर १०० कोटी नफा व ७००० कोटी ठेवीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कसोशीने प्रयत्न करावेत.
यावेळी संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक अनिल पाटील, आर. के. पोवार,  बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, बी. आर. पाटील, ए. बी. परुळेकर, भगवानराव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. ए.बी. माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद व्हराबळे यांनी केले. आभार गोरख शिंदे यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments