अरुण लाड यांनी घेतली भैय्या माने यांची भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेले अरुण लाड यांनी प्रताप उर्फ भैय्या माने यांची भेट घेतली. या भेटीत श्री. लाड यांनी भैय्या माने यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्याची विनंती केली.
दरम्यान; भैया माने यांनी आपण उमेदवारीबाबतचा निर्णय शनिवारी ता.१५ सकाळी ११ वाजता कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची व नेत्यांची कोल्हापुरात बैठक घेऊन जाहीर करू, असेही यावेळी सांगितले.
प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, पुणे पदवीधरच्या मतदानाची तारीख जवळ येत असताना पक्षाकडून कोणतीही सूचना अगर संवाद न झाल्यामुळेच ऐनवेळी गडबड व्हायला नको म्हणून अर्ज भरला.अरुण लाड म्हणाले, राष्ट्रवादीसह काँग्रेस , शिवसेना व मित्र पक्ष एकसंघपणे लढून पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवूया.